Home अमरावती महिला लोकशाही दिनाला प्रतिसाद नाही: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एकही तक्रार दाखल नाही,...

महिला लोकशाही दिनाला प्रतिसाद नाही: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एकही तक्रार दाखल नाही, यंत्रणेवरील विश्वासाचा प्रश्न चर्चेत.

26
0

आशाताई बच्छाव

1001250006.jpg

महिला लोकशाही दिनाला प्रतिसाद नाही: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एकही तक्रार दाखल नाही, यंत्रणेवरील विश्वासाचा प्रश्न चर्चेत.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख जिल्हा प्रतिनिधी अमरावती.
अमरावती.
अमरावती जिल्हाअमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनाला एकही महिला तक्रारदार उपस्थित राहिली नाही दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला मिळालेला हा प्रतिसाद चिंताजनक मानला जात आहे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या निर्देशानुसार कार्यालयाचे अधीक्षक डॉक्टर निलेश खटके यांच्या दलानात बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी राजेशनिवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या निर्देशानुसार कार्यालयाचे अधीक्षक डॉक्टर निलेश खटके यांच्या दलाला बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी राजेश नांदणे आणि जिल्हा परिषद अधिकारी मेघा महात्मे यांच्या सहसामान्य प्रशासन विभागाच्या अहवाल कारकूनन भार्गव उपस्थित होत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेले काही महिने हा लोकशाही दिन स्थगित होता गेल्या महिन्यापासून पुन्हा सुरू झालेल्या या उपक्रमाला मागील महिन्यातही कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती20२४,आगस्ट पर्यंत च्या प्रलंबीत तक्रारी संबधीत तालुकांच्या माताव बालसंगोपण अधिकाराकंडेपाठविण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलतान यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या मते महिलावरील, अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना तक्रारीचे संख्या शून्य असणे हे गंभीर आहे त्यांनी यंत्रणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे तक्रारीचे निवारण योग्य पद्धतीने न झाल्यामुळे महिला तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे त्यांचे मत आहे या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास आणि कार्यक्षमता बाबत प्रश्न उपस्थित होत आहे महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आलेल्या या व्यवस्थेत अमुलाग्र बदल करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Previous articleविचारवंत शरद पाटील यांच्या तत्त्वज्ञानाचा महत्त्व: मार्क्सवादी फुले आंबेडकरवादी विचारांची मांडणी मुक्तीदायी आणि व्यावहार्य.
Next articleआदर्शवादी राजा,छत्रपती शिवराय माझा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here