आशाताई बच्छाव
संदीप वसंतराव पाटील तालुका प्रतिनिधी साक्री ,:-साक्री तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायतचे नेते सुभाष निंबा माळचे यांनी टिटाणे गावासाठी मंजूर झालेली जनजीवन मिशन पाणीपुरवठा योजना ही 2022 तर 2023 यावर्षी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली ही योजनेचा एकूण इस्टिमेट 359 लक्ष रुपये एवढा असून कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असा आहे वारंवार सूचना देऊनही कामामध्ये कुठेही गुणवत्ता दिसून येत नाही यासंदर्भात आज रोजी दिनांक 17 2 2025 रोजी संबंधित बांधकाम अभियंता पवार साहेब यांना पत्र देऊन कामाची चौकशी करून कामाचे गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न करावेत असा अर्ज ग्रुपग्रामपंचायतचे नेते सुभाष माळचे यांनी दिले तसेच बांधकाम विभागाचे आर एम पवार यांना पण ईसरडे वसंत नगर आंबेमोहोर आणि पन्हाळी पाडा टिटाणे या गावांतर्गत झालेले रस्ते ठक्कर बाप्पा योजनेतून आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आणि आमदार निधीतून जेवढे ही रस्ते या गावांमधून झालेले आहेत त्या संपूर्ण रस्त्यांची अवस्था अतिशय निकृष्ट अशी आहे त्या रस्त्यांचे कामाचे इस्टिमेट मागवण्यासाठी अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायतीचे विरोधी पक्ष नेते सुभाष मार्च यांनी सांगितले आहे की संपूर्ण ग्रामपंचायतची मागील 2019 पासून तर 2025 मार्चपर्यंत आलेला विविध योजनेमधून किती निधी आला आणि कोणते कामे केली या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्याचे त्यांनी सांगितले तसेच मागील सात वर्षापासून ची संपूर्ण ग्रामपंचायतची चौकशी करण्याचे ठरवलेले आहे प्रत्येक योजनेचे पुरावे गोळा करून संबंधित गटविकास अधिकारी यांना सादर करून चौकशी करण्याचे त्यांनी सांगितले वित्त आयोग पेसा ग्रामनिधी पाणीपुरवठा ठक्कर बाप्पा या संपूर्ण विभागामार्फत आलेला निधीचा वापर कसा झाला व किती निधी आला याची चौकशी त्यांनी लावलेली आहे असे त्यांनी सांगितले