आशाताई बच्छाव
सावधान, सावधान, सावधान!
या तोतया पत्रकारापासून सावध…!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव,दि.१८:- कळवण तालुक्यात व आसपासच्या परिसरात “युवा मराठा न्यूज नेटवर्क”च्या नावाने व “युवा मराठा न्यूज चॅनल”चे कळवण तालुका अधिकृत प्रतिनिधी बाळासाहेब निकम यांच्या नावाचा गैरवापर करून धुमाकूळ घालणाऱ्या तोतया पत्रकारापासून नागरिकांनी सावध रहावे असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.
“युवा मराठा न्यूज चॅनल”परिवाराने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,कळवण तालुक्यातील ककाणे येथील संभाजी कडू वाघ हा व्यक्ती “युवा मराठा न्यूज चॅनल”चा कुठलाही अधिकृत प्रतिनिधी नसताना त्याने कळवण तालुक्यात व आसपासच्या परिसरात नागरिकांना धमकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, नागरिकांना कळविण्यात येते की,सदरचा व्यक्ती हा “युवा मराठा न्यूज”शी संबंधित नसून त्याच्या गैरव्यवहाराच्या कुठल्याही प्रकारास “युवा मराठा न्यूज”व्यवस्थापन जबाबदार नसून, लवकरच संबंधित व्यक्ती संभाजी कडू वाघ विरोधात “युवा मराठा महासंघ”कळवण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांचेकडे लेखी तक्रार दाखल करणार आहे.