Home पुणे दापोडीत शिवजयंतीनिमित्त खेळाडूंना शिवराया क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान

दापोडीत शिवजयंतीनिमित्त खेळाडूंना शिवराया क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान

20
0

आशाताई बच्छाव

1001242212.jpg

दापोडीत शिवजयंतीनिमित्त खेळाडूंना शिवराया क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील
जगाच्या पाठीवर राजे महाराजे, बादशहा, हुकुमशहा अनेक होऊन गेलेत परंतू जनतेच्या हदयसिंहासनावर अनंत काळासाठी अधिराज्य गाजवनारे केवळ बोटावर मोजण्या इतके इतिहासात आढळतात त्यात अगदी वरचा क्रमांक आपल्या राजांचा म्हणजे युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा ,अशा या महापुरुषांच्या जयंती निमित्त ,पावर लाईन जीम यांच्यावतीने दापोडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ,कैलास जाधव पावर लाईन क्लब अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे आदर्श शिक्षक यांच्या शुभहस्ते पुष्पहार ,घालण्यात आला ,व तसेच यावेळी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिवराय क्रीडा पुरस्कार प्रज्वल सीतापुर यशराज जवळकर विजय रणसिंग प्रल्हाद भोयर रमेश मोरे केलमेट गायकवाड जेकब जोसेफ यांना सुरेश साळवी माजी राष्ट्रीय मुष्टीयोद्धा गणेश जाधव बॉडी बिल्डर कोच मधुकर रणपिसे गणेश सहकारी बँक संचालक व सुभाष जाधव यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी लक्ष्मीकांत बाराथे शेखर गोरगले रोहिदास मदने ध्रुवांकुर कवडे,शैलेश सर्व गोड ऋषभ शिर्के वेदांत झपके अदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज बासुतकर व आभार प्रदर्शन सदानंद साबळे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here