आशाताई बच्छाव
विस्थापित दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेनचा मुख्याधिकाऱ्यांना फोन
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी – शिर्डी श्रीरामपुरातील गेली 40 वर्षापासून नगरपालिकेच्या हद्दीत आपला विविध प्रकारचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करून श्रीरामपूर नगरपालिकेला न चुकता कर भरत असलेले दुकानदार यांची दुकाने नगरपालिकेने 27 फेब्रुवारी पासून जमीन उद्ध्वस्त केले आहे त्या दुकानदाराचे पुनर्वसन करावे तसेच तात्पुरत्या स्वरूपात त्यांना ताबडतोब पाच फुटाची जागा व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये विस्थापित व्यापाऱ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यावेळी समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन यांनी विस्थापित झालेल्या श्रीरामपुरातील दुकानदारांची सविस्तर माहिती देऊन श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी घोलप यांना फोन लावण्यासाठी विनंती करण्यात आली त्यावेळेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगेच सुभाष त्रिभुवन यांना फोन लावण्यात सांगितले त्यावेळी मुख्याधिकारी घोलप यांना विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना ताबडतोब त्यांची उपजीविका भागवण्यासाठी पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना केल्या त्यावेळी मुख्याधिकारी घोलप म्हणाले की मी लगेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे श्रीरामपुरातील विस्थापित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव पाठवतो व त्या व्यापाऱ्यांना ताबडतोब पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय वाकचौरे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे मिलिंद धीवर आलोक थोरात अनिल रणनवरे सुनील शिरसाठ सुरेश जगताप किशोर ओझा विशाल साबद्रा श्याम श्रीवास्तव शब्बीर मण्यार राकेश थोरात नसरुद्दीन आतार मस्जिद मेमन जयसिंग देवकाते कैलास बाविस्कर प्रदीप निकुंभ ओंकार बारस्कर जावेद अत्तार लक्ष्मी कुवर अशीर सय्यद आधी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते लवकरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब श्रीरामपूरला भेट देणार आहेत