आशाताई बच्छाव
स्वामी विवेकानंद महाविद्यालयात
संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि १५ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.बी.बाविस्कर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत पाटील व प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. आर.बी.मादळे उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते डॉ.आर.बी. मादळे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन व कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.एल.सकनुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.ई.व्ही. भिंगोले यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.एन.एच. पांचाळ, डॉ.सय्यद.एम.एम., डॉ. जे.पी.काळे, प्रा.ढोकाडे आर.एस., डॉ.जी.जी. शेख, प्रा.राम बिरादार, प्रा.धनंजय मलशेट्टे, बालाजी सादगिरे, काशिनाथ शिंदे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.