आशाताई बच्छाव
स्वतःच्याच जमिनीवर घरकुल बांधण्यास आदिवासी कुटुंबावर अमानुष अत्याचार..!!
(ताहाराबाद,प्रतिनिधी)बागलाण तालुक्यातील करंजाड येथील आदिवासी समाजातील दयाराम दौलत शिंदे हे अनेक वर्षांपासून चिंचबारी शिवारातील गट नंबर 82 मधील त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर झोपडी करून राहतात. त्यांना नुकतेच ग्रामपंचायत करंजाड मार्फत शबरी आदिवासी घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे.म्हणून काल दिनांक 11/2/2025 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजेच्या दरम्यान दयाराम शिंदे हे पत्नी बागुबाई,मुलगा संजय,सून मंगल व परिवारातील इतर सदस्यांसोबत नवीन घराचा पाया खोदण्यासाठी आपल्याच वडिलोपार्जित जमिनीवर गेले असता त्याठिकाणी काशिनाथ सहादू देवरे व त्याचा मुलगा नानू काशिनाथ देवरे हे येऊन दमबाजी करून शिवीगाळ करू लागले, म्हणून दयाराम शिंदे व संजय शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता नानू देवरे याने उद्धटपणे जातीवाचक शिवीगाळ सुरु केली.
दयाराम शिंदे यांच्या मालकीच्या शेतजमिनीतून पाटचारी देखील गेली आहे, शासनाकडून त्यांना शेतजमिनीचा मोबदला म्हणून काही रक्कम दिल्याची पावती आहे,सातबारा नावावर असून इतर लोकांच्या जाचाला व अन्यायाला आदिवासी कुटुंब अनेक वर्षांपासून बळी पडत आहे.म्हणून या आदिवासी कुटुंबाची एकच मागणी आहे की स्वतःची जमीन असून आम्हाला शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळू द्यावा व आमचीही झोपडीची अवस्था बदलावी म्हणून आम्हाला प्रशासन व शासनाकडून न्याय हवा अशीच मागणी हे आदिवासी कुटुंब शासन दरबारीं सध्या करत आहे.