आशाताई बच्छाव
विस्थापित व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करावं या मागणीला रिपाईचा जाहीर पाठिंबा
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने विस्थापित झालेल्या दुकानदाराचे पुनर्वसन करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन होईपर्यंत व्यापार करण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजन सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जाहीर पाठिंबा असून त्यांना न्याय देण्यासाठी श्रीरामपूरातील सर्व पक्ष संघटनांनी चमडी बचाव धोरण बंद करून अडचणी सापडलेल्या व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या आंदोलनात मैदानात उतरून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे तसेच विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करणे ही पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची जबाबदारी आहे जर त्यांनी ती पार पाडली नाही तर विस्थापित व्यापारी श्रीरामपूर नगर परिषदेला दोष न देता पालकमंत्र्यांना देतील म्हणून पालकमंत्र्यांनी विस्थापित व्यापाऱ्यांचा पालकत्व स्वीकारून व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना सुखी जीवन जगण्यासाठी पाठबळ द्यावे असे शेवटी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड रिपाईच्या रमाताई धीवर संदीप पवार बाबासाहेब पवार यावेळी व्यापारी पवन ललवाणी कैलास बाविस्कर शरीफ शेख सूर्यकांत बारस्कर अक्षय छाजेड श्रीराम निकुंभ विशाल सावद्रा किशोर ओझा मजीद मेमन राजू श्रीवास्तव तांबोळी सद्दाम सय्यद आसिफ मणियार दिलीप प्रधान असलम उज्वला येवलेकर अत्तार बेबीताई पालकर तरनुम अत्तार सुमन थोरात सुलताना रशिदा आत्तार शांताबाई राठोड आदिनाथ सुपेकर बॉबी सहानी कल्पना नरवडे ऋषिकेश कासलीवाल आधी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते