आशाताई बच्छाव
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी -अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करावे तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत व्यापारी बांधवांना पाच फुटाची जागा पोट भरण्यासाठी देण्यात यावी या मागणीसाठी सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली
श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मेन रोड गांधी पुतळा या ठिकाणी बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून गांधी पुतळा मेन रोड या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे तरी श्रीरामपूर नगर परिषदेने व्यापारी लोकांची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे तालुकाध्यक्ष लखन भगत शिवसेनेचे थोरे मामा आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवल मल्लू शिंदे राष्ट्रवादीचे अनिल भनगडे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित