आशाताई बच्छाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मागणी
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –महामानव भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव यांना वंचित बहुजन आघाडीचे गटप्रमुख प्रवीण साळवे संपर्कप्रमुख किशोर ठोकळ गणप्रमुख नवनाथ गुडेकर महिला तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका महासचिव दर्शनाताई काळे तालुका उपाध्यक्ष जयश्रीताई पवार यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की एका कार्यक्रमांमध्ये राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर देशद्रोहाचा तसेच भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा कारण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष असून देशासाठी व समाजासाठी त्यांचे फार मोठे योगदान असून त्यांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही माथेफिरू जातीयवादी राहुल सोलापूरकर वर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आले आहे