आशाताई बच्छाव
मौजे पिंगाणे ,ग्रामसेवक,सरपंच, विस्तार अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा. मौजे पिंगाने ते पंचायत समिती पायी मोर्चा व अमरण उपोषण….
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (सैनिकी विभाग) श्री. उल्हास दादा पाटील
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
मौजे ग्रामपंचायत पिंगाने तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निधीचा अपहार अनियमयता झाली असल्याच्या मोठ्या प्रमाणात नागरिकाच्या व संघटनेच्या तक्रारी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्याकडे आल्या असल्याकारणाने या ग्रामपंचायतची सखोल चौकशी करून ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी, यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958 तरतुदीप्रमाणे थेट फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी व उपोषण दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वात पिंगाणे ग्रामपंचायत ते शहदा पंचायत समिती पाई मोर्चा व पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे , पिंगाणे ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याच्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत ग्रामसभा न घेणे, कागदोपत्री ग्रामसभा दाखवून शासनाची दिशाभूल करणे ,रस्ते नाली सार्वजनिक शौचालय बोगस कामे करून मोठ्या प्रमाणात आर्थिक मालमत्ता गोळा करणे, ग्रामपंचायत रेकॉर्डची खाडाखोड करून मनमानी कारभार करणे संबंधित विस्तार अधिकारी यांच्या संगनमताने खोटे रेकॉर्ड करून निधी हडप करणे, मासिक ग्रामसभा न बोलवणे, विकास कामाची अंमलबजावणी जाहीर प्रगटन न काढणे, अंदाजपत्रक न लावणे ,बोगस रस्ते तयार करून निधी हडप करणे ,जन्म मृत्यू विवाह नोंदणी न ठेवणे सार्वजनिक स्वच्छता न ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था न करणे ,शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी न पुरवणे, शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य ठिकाणी वापर न करता बोगस काम करून निधी हडप करणे, जमा खर्च अर्थसंकल्प कागदोपत्री तयार करून मासिक सभेमध्ये वाचन न करणे, अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या असल्या कारणाने पिंगाणे ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे , मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने संबंधित ग्रामसेवक, सरपंच ,विस्तार अधिकारी यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी कर्मचारी यापैकी कोणी अथवा सर्वजण चौकशी आणती दोशी आढळल्यास ..? गटविकास अधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करावी व त्यांच्याकडून निधीचा अपहार झाला असल्याचा अहवाल विना विलंब तात्काळ सादर करावा अहवालाची प्रत वरिष्ठाकडे व संघटनेकडे देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री.प्रदीप पाटील(बाबा)खंडापूरकर,निवड समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री.अनिल दादा देसले व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री.चंद्रकांत जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मौजे पिंगाने तालुका शहादा पंचायत समितीवर पायी मोर्चा व आमरण उपोषण दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या हल्ला.!बोल मोर्चामध्ये आमरण उपोषणात..! सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (सैनिकी विभाग) श्री. उल्हास दादा पाटील यांनी केले आहे.