आशाताई बच्छाव
स्नेहसंमेलनातून जीवन सुंदर आहे हे प्रबोधनाची गरज आहे– मालिका फेम अनिता केळकर सोनई, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
शनिशिंगणापूर – ग्रामीण जीवनाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असल्याने खरं वास्तव्य जीवन जगण्यात एक आनंद आणि जीवन एक सुंदर पुनरुपी न येणार जीवन जगण्याची जनजागृती आज स्नेहसंमेलनातून खरी गरज असल्याचे प्रतिपादन टीव्ही फेम अभिनेत्री अनिता केळकर यांनी केले. स्व. मा. खा. तुकारामजी पाटील गडाख यांच्या प्रेरणेने आदर्श विद्या मंदिर (प्राथमिक) सोनईच्या आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई गडाख या होत्या. प्रत्येक वर्षी सचिव रविराज पाटील गडाख यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा या संमेलनाचे आयोजन करत आहे. यावेळी शिक्षणाधिकारी पाटील साहेब,लक्ष्मीबाई गडाख, विजय माळी, ऋषिकेश शेटे, सचिन देसरडा, अंबादास राऊत, अरुण चांडघोडे, शशिकांत लांडे, विशाल भळगट, रासिकशेठ भळगट आधी उपस्थित होते. अनिता केळकर म्हणाल्या दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या व्यथा समस्या दुःख सुख यातून मनावर कुठल्याही प्रकारच्या टेन्शन न घेता वेगळ्या शैलीत जगले पाहिजे हा संदेश प्रत्येकाने जोपासला पाहिजे जीवन एक सुंदर कला आहे याचं उदाहरणे देऊन टोकदार मत व्यक्त केले.खातील रट्टे तर सुधरते पोट्टे, लहानपणी रट्टे खाल्ले की नाही,असा सवाल करत विद्यार्थी कडून एकच जल्लोष, शिट्टयाचा आवाज व हास्य विनोद केळकर यांनी केला.शिक्षणाधिकारी पाटील साहेब म्हणाले, विद्यार्थ्यांनी आत्ताच आपले ध्येय दिशा ठरवून संस्कार,संस्कृती,जपून एक आयुष्याला वळण देण्याची गरज असल्याचे सांगितले दिशा नसेल तर दशा होईल अशी ही भीती त्यांनी व्यक्त केली. मोबाईल वापरू नका असे सांगितले. वर्षभरात विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल दरंदले तर आभार प्रदर्शन खेसमाळसकर सर यांनी केले. आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून भाषा पेहराव आणि संस्कृतीने सोनई कर अक्षरश भारावून गेले होते या कार्यक्रमातून बालकलाकारांनी युवक युवतींनी अखंड भारताचे दर्शन करून विविध द्वारे लक्ष वेधले. या कार्यक्रमास सर्व परिसरातील पत्रकार, विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक अध्यापक पालक व विद्यार्थी यांची संख्या दहा हजाराच्या वर उपस्थिती होती.