आशाताई बच्छाव
शेतक-यांच्या प्रश्नासाठी लोकविकास संघटनेचे आंदोलन
मयुर खापरे प्रतिनिधी, दि. ३० डिसें. चांदूर बाजार
राज्यातील शेतकर्यांना निवडणुकीदरम्यान नेत्यांकडून सरसकट कर्जमाफी, सोयाबीन कापूस व तुरीला योग्य हमीभाव देऊन शेतकर्यांना अच्छे दिन आणण्याचे आश्वासन देण्यात आली होते.
त्या सर्व गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आज अमरावती जिल्ह्यातील शेतकर्यांनी लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव व रमण लंगोटे यांच्या नेतृत्वात चांदूरबाजार येथील जयस्तंभ चौक मध्ये ढफळी बजाव आंदोलन करून शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून सोयाबीन ला 7000 रु हमीभाव, कापसाला 9000 रू हमीभाव तर सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अजून पर्यंत ही सोयाबीन भाव वाढ करण्यात आली नाही.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी,
सोयाबीन, कापूस भाव वाढ या दिलेल्या आश्वासनाची राज्य सरकारला आठवण करून देण्यासाठी व अमरावती जिल्हा गारपीठ ग्रस्त
यादीमध्ये
कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुध्दा सुरुवात झाली नाही. त्याचबरोबर तुरीचा घसरत चाललेला भाव व अमरावती जिल्हा गारपीट ग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यामुळे शेतकर्यांनी एकत्र येऊन राज्य सरकारला निवडणुकी दरम्यान त्यांनी प्रचारात दिलेल्या
आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम चांदूर बाजार जयस्तंभ चौक येथे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ढपळी बजाव आंदोलन करून सरकारचे विरोधात घोषणाबाजी करून शासनाच्या
शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. व सर्व शेतकरी मिळून मुख्यमंत्री यांना तहसीलदार चांदूरबाजार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी लोक विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव, संघटक रमण लंगोटे योगेश ईसळ आकाश खेलदार इरफान सौदागर, ऋषिकेश रडके, दत्ताभाऊ विचे, राम हुशंगावबादे, अजय वाघमारे, राजेंद्र लंगोटे, सोपान पोहकार सह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.