Home बुलढाणा ब्रेकिंग ! मेहकर-डोणगाव रोडवर भीषण अपघातः स्कूटी- आयशरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू!

ब्रेकिंग ! मेहकर-डोणगाव रोडवर भीषण अपघातः स्कूटी- आयशरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू!

17
0

आशाताई बच्छाव

1001061666.jpg

ब्रेकिंग ! मेहकर-डोणगाव रोडवर भीषण अपघातः स्कूटी- आयशरच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- डोणगाव मेहकर ते डोणगाव रोडवरील लांडे वाडी फाट्याजवळ आज 18 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता स्कूटी आणि आयशर ट्रकच्या जोरदार धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकरहून येणाऱ्या स्कूटीला नागपूरकडून मेहकरकडे जाणाऱ्या आयशर (क्र. MH04 GR 0867) ने धडक दिली. या भीषण
अपघातात स्कूटीस्वार तरुणी वैष्णवी किरण चंदनशिवे (राहणार अण्णा भाऊ साठे नगर, मेहकर) हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
वैष्णवी ग्रामीण कुटा फायनान्समध्ये काम करत होती आणि सकाळी वसुलीसाठी जात असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस हर्ष सहगल आणि पोलीस मित्र रहीम खान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आयशर चालकाला ताब्यात घेऊन वाहन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here