आशाताई बच्छाव
! खाकी वर्दीला फोडला घाम ! – आमदार गायकवाड यांच्या लक्षवेधीने अंगात भरलिया हुडीहुडी ! – म्हणालेत.. ६ महिन्यांमध्ये ३ जातीय दंगली !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यामध्ये अनेक जातीय दंगली, गोमातेची तस्करी करून कत्तल, अवैध गुटखा, सर्रास अवैध धंदे, हेल्मेट सक्ती, अल्पवयीन मुली
अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून खाकीला चांगलाच घाम फोडला.
आज १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशनात दरम्यान नागपूर येथे महत्त्वपूर्ण लक्षवेधी उपस्थित करताना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघातील तसेच शहरातील विविध महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले. यावेळी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करताना गायकवाड यांनी सांगितले की, सध्या
कार्यरत असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या कारकिर्दीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील ०६ महिन्यांमध्ये तीन जातीय दंगली झाल्या, आतापर्यंत लाखोंच्या संख्येने मोटरसायकल चोरी गेल्या, परंतु त्यांचा देखील पत्ता लागत नाही, त्यांची दखल ही पोलीस स्टेशनला घेतले जात नाही, घरफोड्या, चोऱ्या, वाटमाऱ्यांची संख्या ही हजारांच्यावर गेलेली आहे, अवैध दारू तसेच गावठी दारूचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, तसेच मतदारसंघामध्ये भाजी पाल्याप्रमाणे वरली तसेच चकऱ्यांची दुकाने सुरू आहेत .
ज्या गोमातेला आपण राजमातेचा दर्जा दिला तिची सर्रास हत्या सुरू आहे तसेच तिची तस्करी सुरू
आहे. मध्यप्रदेश मधून येणारा अवैध गुटखा तसेच दारू ही सर्रासपणे शहरातील तसेच मतदारसंघातील पानटपऱ्यामध्ये लाखो रुपयांचे हप्ते देऊन विकल्या जातो. हजारोच्या संख्येने मतदारसंघातील अल्पवयीन मुली या बेपत्ता झाल्या परंतु पोलीस प्रशासनाला त्या शोधण्यात देखील अपयश आलेले आहे.
तीन वर्षांपूर्वी आमदार गायकवाड यांच्या घरासमोरील गाडीला समाजकंटकांनी पेटवून दिले होते त्याचा शोध देखील आतापर्यंत पोलिस प्रशासनाला लावता आला नाही. वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक बळी आपण जाताना बघत आहे हेल्मेट सक्ती असूनही हेल्मेट सक्ती करताना कोणीही दिसत नाही आणि त्यामुळे अनेक बळी हे दररोजचे जात आहेत.
जुगार आणि अवैध धंदे हे सर्रासपणे पोलीस अधीक्षकांच्या समोर सुरू असताना देखील त्यावर कोणतीही कारवाई होत नाही कारण सर्वांचे लक्ष हे फक्त वसुलीवर आहे, परराज्यातून येणारे बटन नावाचे कॅप्सूल, गांजा, ड्रग्स, बॉण्ड हा नशा करून अल्पवयीन मुलं इतके बेधुंद होतात की त्यांच्याकडून एखादा गंभीर गुन्हा जरी झाला तरी त्यांना कळत नाही, त्यामुळे यावर देखील कोणताही बंधन घातले गेलेले नाही. या औचित्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करून या गैरप्रकाराला आळा घालण्याकरता शासन लवकरात लवकर कारवाई करणार आहे का असा महत्त्वपूर्ण मुद्दा यावेळी आमदार गायकवाड यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला.