आशाताई बच्छाव
परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडफोड प्रकरणी घडलेल्या प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा पवनी तहसील कार्यालयावर मोर्चा
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडी शाखा पवनी तर्फेचा दिनांक 10 डिसेंबर रोजी परभणी येथे भारतीय संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्या प्रकरणी व त्यावरून आंबेडकरी समाजाला कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी तसेच होणारे अन्यायाप्रकरणी न्याय मिळवून देण्यासंदर्भात आज पवनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनील जीवनतारेव जिल्हा अध्यक्ष डी जी रंगारी यांचे नेतृत्वात यांचा नेतृत्वात काढण्यात आलाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डी जी रंगारी ,जिल्हा उपाध्यक्ष सुनील जीवनतारे ,विकास राऊत ,प्रदीप खोब्रागडे, ब्रह्मदास बागडे, नवनाथ आकरे, संगदीप देशपांडे यांचेही भाषणे झालित
त्यामध्ये आपरेशन आणि एकूण सर्व प्रकरणातील न्यायालयीन चौकशी करावी कलम 176 एक सीआरपीसी अनन्वये या प्रकरणाची चौकशी करावी, न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सीटिंग न्यायाधीश मार्फत करावी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 ॲट्रॉसिटी कायद्याने कलम तीन एक आणि तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावेत सोबतच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा
परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने शीसी टीवी जप्त करून ते सीसीटीव्ही तपासावे ,सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या रेकॉर्डिंग घेणे कुटुंबीयांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी ,सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्याचे पुनर्वसन करावे , वच्छलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलीस जानवर तातडीने 354 360 अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे, व च्छलाबाई मानवते यांच्या सरकारने 10 लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे, न्यायालयीन कोटडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीश यांच्या उपस्थितीत मेडिकल करावे, पोलिसांनी केलेल्या कोबीन कारवाईक बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरातील नुकसान भरपाई द्यावी, जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरातले तातडीने पंचनामे करून घ्यावे पोलिसांच्या कोबीग कारवाईक निर्दोष जखमी झालेल्या ला तातडीने आर्थिक मदत करावी ,
संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, 10 डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष डी जी रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुनील जिवंनतारे ,धर्मदास भांबोरे, नवनाथ आकरे ,यादव मेंढे, राजकुमार रामटेके, योगेश रामटेके, संगदीप देशपांडे, अलका गौतम ,अर्चना गजभिये, भैय्या मेश्राम ,ब्रह्मदास मेश्राम, एकनाथ मेश्राम , यादव भोगे, एकनाथ, रंगारी, डायमंड शेंडे राजकुमार लोखंडे ,विलास मेश्राम ,रक्षित बारसागडे, विलास राऊत ,शैलेश मयूर, संजीव खोब्रागडे ,मधुकर मेश्राम बंडू बनकर, मार्तंड गजघाटे व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.