आशाताई बच्छाव
अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया( असोसिएशन) तर्फे चामोर्शी तालुक्यातील चित्तेकरणार गावात “आशा की किरण”जनजागृती मेळावा संपन्न
शासकीय योजने पासून व लाभा पासून अजूनही चित्तेकरणार गावातील कित्येक गावकरी वंचित,गावात अनेक समस्यांचा डोंगर
छोट्या बालकांनी गोंडी नृत्य करून केला पाहुण्यांचा स्वागत
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया असोसिएशन अंतर्गत गडचिरोली सारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावात प्रत्येक घरा घरात महाराष्ट्र सरकार व सेंटर गोरमेंटच्या कल्याणकारी योजना पोहोचवून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानेच चित्तेकनार गावात आशा की किरण जनजागृती मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती व माहितीचा अधिकार विषय संबोधित करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व अविकसनशिल आदिवासीबहूल आहे.या जिल्हयातील अनेक गावे अजुनही विकासाच्या मुख्य प्रवाहात नाहीत.आरोग्य,शिक्षण , रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत.जिल्हयातील अनेक गावे अतिशय दुर्गम अवस्थेत आहेत.तिथे अदयापही शासकीय योजना पोहचत नाही.त्यामुळे येथील भुमीपूत्रांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागते.अशात त्यांची मोठीच दैना होत आहे.गडचिरोली जिल्हयातील चार्मोशी तालुक्यातील चित्तेकनार हे असेच गांव आहे,या गावातील नागरिक अदयापही मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत.त्यांची हि अवस्था लक्षात घेता अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया( असोशिएशन) हि राष्ट्रीय संघटना सरसावली.त्यांनी ‘‘आशा कि किरण’’ हा अनोखा उपक्रम राबवित गावात जनजागृतीची मशाल पेटविली.
शासनाच्या कल्याणकारी आयुष्मान भारत , महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी योजना, निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा, अपंग यांच्या निवृत्ती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी,पारधी, आदिम योजना, मोदी आवास योजना, प्रधानमंत्री पिक विमा, शेतकरी सन्मान निधी, महाडीबीटी, मागील त्याला शेततळे, मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना, तसेच राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना सौर वाहिनी तसेच कुसुम सोलर पंप योजना, गोवर्धन गोवंश सेवा योजना, बाल संगोपन योजना, मातृ वंदन योजना, बेबी किट योजना, विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, स्वनिधी योजना, मुद्रा योजना, रोजगार निर्मिती योजना, बांधकाम कामगार योजना, घरेलू कामगार योजना, राज्य परिवहन मंडळाच्या योजना, लाडली बहीण योजना, वयोश्री योजना इत्यादी शासकीय कल्याणकारी योजनेची सविस्तर माहिती देऊन त्या योजनेचा लाभ कसा मिळवायचा या “आशा कि किरण” जनजागृती मेळ्याव्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज उराडे यांनी सर्व गावकऱ्यांना माहितील दिली.
गरीब,सामान्य नागरिकांवर होत असलेला अन्याय,त्यांना मिळत नसलेल्या शासकीय योजना,सरकारी विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम संघटना सातत्याने करित आली आहे.गडचिरोली जिल्हयातील चार्मोशी तालुक्यातील चित्तेकिनार गावात समस्याचा डोंगर आहे.येथील गरीब,सामान्य व आदिवासी बांधवाना विविध शासकीय योजना व त्याचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहोचत नसल्याने येथील नागरिकांमध्ये शासना विषयी कमालीचा संताप असल्याचे दिसून आले,
दरम्यान हि बाब संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांच्या लक्षात आली.त्यांनी याची दखल घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिका-यांना याबाबचतची माहिती दिली.अनं अखेर या गावात संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी दाखल झाले व “आशा कि किरण” मेळावा घेऊ नागरिकांमध्ये शासकीय योजनेची जनजागृती करण्यात आली.
गावकऱ्यांनी असोशिएशन च्या चमूकडे मांडल्या विविध समस्या व्यथा , त्यात पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू, शासकीय कर्मचारी कार्यालयात राहत नसल्यामूळे कोणतेही दाखले वेळेत मिळत नाही , गावात नाली आहे पण नालीची उपसा झालेली नाही, जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत नाही, घरकुलाच्या समस्या, वृद्ध निवृत्ती योजना, पिण्याचं पाण्याची समस्या, सभागृहाची समस्या, नाली उपसा न केल्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या, विकास कामाची समस्या,ग्रामपंचायत च्या समस्या अशा विविध समस्या गावक-यांनी जिल्हाध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्यासमोर मांडले, तुमच्या समस्या व शासकिय योजनेपासून वंचित असणाऱ्या गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची संघटना कटीबद्ध आहे, आपल्या समस्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुराठा करून तुम्हाला योग्य तो न्याय मिळवून देऊ अशी ग्वाहि गावकऱ्यांना संघनेच्या अध्यक्षांनी दिली.
संघटने तर्फे
या मेळाव्याचा नियोजन उपाध्यक्ष सुरज गुंडमवार यांनी केला.
यावेळी जनजागृती मिळाव्यात उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय सचिव,रामचंद्र साबळे,सरपंच हरिदास कडयामी,जिल्हा सत्र न्यायालयाचे अॅड.अरूण अंजनकर,मुख्याध्यापक गावडे,ग्राम मुखीया मानुजी पाटील पोटावी,गाव पाटील कोतलू पाटील उसेंडी, पोलीस पाटील,सावित्रीबाई कोवासे,युवा नेता विजय गोटा,येवा नेता देवसाय मडावी,शिक्षीका कविता ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आशा कि किरण हा उपक्रम संपन्न आला.
यावेळी विविध उपक्रम राबवित जनजागृती मशाल पेटविण्यात आली , प्रभावित झालेल्या गावक-यानी संघटनेचे शतश आभार मानले.