आशाताई बच्छाव
वसमत विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दिलेला शब्द पाळला पन दादा ने दिली हुलकावणी
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –वसमत विधानसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री आजित पवार यांनी जनसंवाद मात्रा दरम्यान साखर कारखाना रोडवरील झालेल्या मेळ्यात लाडक्या बहिणीचा शब्द दिला होता कि राजुला तुम्ही लाख मतांनी निवडून धा मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो तुम्ही निवडून दिले तर आजच मी शब्द देतो मंत्री करतो.पन वसमतच्या लाडक्या बहिणींनी व मतदारांनी वसमत विधानसभा मतदारसंघात 29 हजार मताधिक्याचा आकडा पार केला व एकूणच राजू भैया उर्फ चंद्रकांत नवघरे पाटील यांना लाखाच्या मताने निवडून दिले व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये परत दुसऱ्या वेळेस संधी दिली अजित दादाचा वादा हा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असतो पण नवघरे यांना निवडून दिल्यानंतरही मंत्रीपद देण्यासाठी मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते नेते मुंबईला रवाने झाली व राजू भैयाला मंत्री करा अशी मागणी अनेक कार्यकर्त्यातून नेत्यातून झाली पण नागपूरचा अधिवेशन 16 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याने मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार 15 डिसेंबर रोजी नागपुरात संपन्न झाला पण वसमत विधानसभेसाठी लाल दिवा मिळेल अशी अपेक्षा वसमत विधानसभेतच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात मोठी होती पण वसमतला लाल दिवा नाही मिळाला यामुळे मतदार संघातील कार्यकर्ते व नेते मोठे निराश झाले आहे एवढेच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यांमध्ये भाजपचे तिसरे ट्रम्प मध्ये निवडून आलेले तानाजीराव मुटकुळे व कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे संतोष बांगर हे शिवसेना शिंदे गट दुसऱ्या वेळेस निवडून आले व वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार हे पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या गटाकडून दुसऱ्या वेळेस निवडून येऊन सुद्धा मंत्रिपद नाही मिळाल्याने हिंगोली जिल्ह्यात कोणालाही मंत्रीपद नाही त्यामुळे यावेळेस सुद्धा हिंगोली जिल्हाल्याचे पालकमंत्री पद दुसऱ्याच्या खांद्यावर असणार आहे त्यामुळे दादाच्या वादा बरोबर हिंगोली करांना आता बाहेरचा पालकमंत्री मिळणार अशी हिंगोली जिल्हा भरामधून बोलल्या जात आहे