आशाताई बच्छाव
टिम राहुल गांधी काॅग्रेस जिल्हा अध्यक्षपदी नरेंद्र मेश्राम निवड
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)- विदर्भ दिव्यांग संघर्ष समिति भंडारा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांची निवड टिम राहुल गांधी काॅग्रेस कमेटीच्या भंडारा जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . हि निवड काॅंग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ,सोनीया गांधी ,राहुल गांधी व काॅंग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी.वेणुगोपाल यांच्या आदेशान्वये महाराष्ट प्रदेश टिम राहुल गांधी काॅंग्रेस अध्यक्ष रोशन अन्सारी यांनी नरेंद्र मेश्राम यांचीभंडारा जिल्हा अध्यक्ष पदावर निवड केली. नरेंद्र मेश्राम यांची जिल्हा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली त्यांचा समाजीक व राजकीय क्षेत्रातील भरीव कामगिरी प्रसार माध्यमातून जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडून लढा देणाऱ्या नरेन्द्र मेश्राम यांची निवड झाल्यामुळे आॅर्किटेक प्रेमदास रामटेके, प्रमोद बेलेकर , भाष्कर लांजेवार ,विजय झंझाड, भाउराव सोनटक्के,ओमप्रकाश खोब्रागडे शालीक लांजेवार , अशोक शेंडे ,शेखर बोरकर ,अनमोल मेश्राम, पंकज वानखेडे,प्रवीण भोंदे, कवण बोरकर, प्रकाश पंचबुध्दे, सचीन कारेमोरे, प्रविण डोरले, विवेक सुखदेवे आदीनी अभिनंदन केले आहे.