Home नांदेड व्हाईस ऑफ मीडियाची देगलूर कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी प्रा.निवृत्ती भागवत,तर सचिवपदी शब्बीर शेख

व्हाईस ऑफ मीडियाची देगलूर कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी प्रा.निवृत्ती भागवत,तर सचिवपदी शब्बीर शेख

26
0

आशाताई बच्छाव

1001044232.jpg

व्हाईस ऑफ मीडियाची देगलूर कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी प्रा.निवृत्ती भागवत,तर सचिवपदी शब्बीर शेख

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड देगलूर -पत्रकारांच्या हिताबरोबर सामाजिक हित जोपासण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची देगलूर कार्यकारिणी जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी प्रा. निवृत्ती भागवत तर कार्याध्यक्ष म्हणून फजल मुल्ला आणि सचिवपदी शेख शब्बीर यांची निवड झाली आहे.तसेच ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र भंडरवार आणि अनिल कदम यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे यांच्या संकल्पनेतून देशभरातील पत्रकारांच्या हिताबरोबरच सामाजिक हित जोपासण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेची देगलूर तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष-प्रा.निवृत्ती भागवत,कार्याध्यक्ष-फजल मुल्ला, उपाध्यक्ष-सतीश पांडवे, सचिव- शेख शब्बीर, सहसचिव- संतोष मनधरणे, कोषाध्यक्ष-प्रा.भीमराव दिपके, सहकोषाध्यक्ष प्रा.संदीप भुताळे, प्रसिद्धीप्रमुख- शिवकुमार बिरादार, सल्लागार- गौतम बनसोडे, प्रा. महेश कुडलीकर,संघटक-गंगाधर मठवाले, संतोष बावगे, शेख असलम, नरसिंग अन्नमवार, सदस्य- वसीम शहापूरकर, गजानन टेकाळे, चंद्रकांत चैनपुरकर, दिगंबर जाधव, मिलिंद हावरगेकर. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या देगलर शाखेचे अनेक सन्माननीय नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here