Home नांदेड मुखेडात परभणी येथे घडलेल्या भारतीय संविधान प्रतिकृतीच्या अवमाना बाबत संविधानवादी जनतेकडून काळ्या...

मुखेडात परभणी येथे घडलेल्या भारतीय संविधान प्रतिकृतीच्या अवमाना बाबत संविधानवादी जनतेकडून काळ्या फिती लावून तीव्र निदर्शने .

59
0

आशाताई बच्छाव

1001044088.jpg

मुखेडात परभणी येथे घडलेल्या भारतीय संविधान प्रतिकृतीच्या अवमाना बाबत संविधानवादी जनतेकडून काळ्या फिती लावून तीव्र निदर्शने .

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड मुखेड –परभणी येथे मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४ रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंठकाकडून झालेल्या तोडफोड व विटंबनेच्या निषेधार्थ मुखेड येथे सर्वपक्षीय व संविधान प्रेमी नागरिकांकडून परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध म्हणून निदर्शने करण्यात आली व तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुखेड यांना निवेदन देण्यात आले.सध्या देशात आणि राज्यात धर्मांध व जातीयवादी विद्वेषाचा प्रचार व प्रसार करुन कायदा सुव्यवस्था बिधडवण्याचे काम होत आहे व सरकार कडुन अश्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसुन येत नाहीत उलटपक्षी अश्या दोषींना पाठबळ देण्याचे काम होत असताना दिसत आहेत यामुळे संविधान विरोधी शक्तींची हिंमत वाढत आहे.
संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर कडक शासन करा तसेच
घटनेतील मुख्य आरोपी व त्याच्या पाठीराख्यांना त्वरित अटक करून संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या संविधानवादी आंदोलकांवरील गुन्हे माघार घेण्याची मागणी करण्यात आली.
मुखेड तालुक्यातील संविधानवादी जनतेकडून तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुखेड यांना निवेदन देवून व काळ्या फिती लावून तीव्र निदर्शने करण्यात आले. या निवेदनावर ॲड.संजय भारदे,समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष के.एच.हसनाळकर, गंगाधर सोंडारे (तालुकाध्यक्ष भा.बौ.म),भारत सोनकांबळे बेट मोगरेकर (पत्रकार तथा संपादक), संतोष बनसोडे (मनसे तालुकाध्यक्ष), पवन कांबळे (वंचित ता.उपाध्यक्ष), केतन भेदेकर (वंचित ता.महासचिव),आकाश कांबळे, परमेश्वर सोनकांबळे, अशोक नाईक, कुलदीप कोत्तापल्ले (कोषाध्यक्ष),संदीप कांबळे बावलगावकर,आशीष भारदे,विजय लोहबंदे,अविनाश कांबळे, बंटी कांबळे, गंगाधर कांबळे मावलीकर, मनोज ढवळे,सचिन गायकवाड,पत्रकार मेहताब शेख,बबलू मुल्ला,रियाज शेख, आसद बल्खी, एस.के.बबलू (ए.पी जे.अब्दुल कलाम समिती),विठ्ठल सोनकांबळे,अजय कांबळे, इत्यादींचा या निषेध कार्यक्रमात सहभाग होता.
या निषेध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड अंकुश माचेवाड यांनी केले.या निषेध कार्यक्रमास मुखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here