आशाताई बच्छाव
जालन्यात परभणी घटनेचा निषेध
संबंधीत आरोपीविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा- दांडेकर
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ
परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व संविधान विरोधी घोषणाबाजी या कृतीचा जाहीर निषेध करत संबंधीत आरेापीविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर यांनी केली आहे. परभणी शहरात मंगळवार 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय ते बस स्टँड रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय संविधानाच्या संदेशक प्रतिकृतीची एका समाज कंटकाने विटबंना केली. सदर घटनेचा जालना शहरात भीम आर्मीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या सुरुवातीस अशा पद्धतीने विकृत व अवमानकारक कृत्य होत असेल तर आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खर्या स्वातंत्र्यात आहोत काय? हा खरा प्रश्न उभा राहतो. असे दांडेकर म्हणाले. सदर घडलेल्या घटनेची मुळ पार्श्वभूमी तपासून सक्षम यंत्रणे कडून चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा आशयाची मागणी करण्यात आली.यावेळी भीम आर्मीचे अॅड. सुभाष सरोदे, वामन दादा दांडगे, एम. यु. पठाण, शांतीलाल दाभाडे, आसाराम पगारे, विठ्ठल कासारे, अंबादास शेजुळ, राजु आढाव यांच्यासह भीम आर्मीचे पदाधिकारी, भीम सैनिक उपस्थित होते.