आशाताई बच्छाव
सर्व संविधान प्रेमींच्या वतीने आज देगलूर बंद ची हाक.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड देगलूर – परभणी येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना मंगळवारी झाली, त्या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी देगलूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देगलूर उपजिल्हाधिकारी मार्फत शासनाला निवेदन देऊन परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला..
याच अनुषंगाने आज दि 13 डिसेंबर 2024 सर्व संविधान प्रेमी नागरिक देगलूर शहर व तालुक्याच्या वतीने देगलूर बंदची हाक देण्यात आली..
या देगलूर बंदमध्ये सर्व शहरातील व्यापारी प्रतिष्ठान , शाळा व महाविद्यालय बंद ठेवून या निषेध बंदमध्ये सामील व्हावे ही नम्र विनंती.