आशाताई बच्छाव
भीषण आग! निवडणुकीचा बदला तर नाही ना? शंका! – झेडपी शाळा अग्नीच्या भक्षस्थानी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-जळगाव जा भूमाफियांचे एवढे प्रस्थ वाढले की कुठेही काहीही करण्याची त्यांची हिम्मत राजकीय बळामुळे सरसावली आहे. त्यामुळेच की काय ? जिल्हा परिषद शाळा आगीच्या भक्षस्थनी सापडली, अशी शंका उपस्थित होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील अगदी मोक्याच्या जागी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला रात्री भीषण आग लागली. याआगीत अनेक
वर्ग खोल्या जळून खाक झाल्या तर शाळेतील फर्निचर, कपाटे, दप्तर व विद्यार्थ्यांचे बाक जळून खाक झालेत. नांदुरा, खामगाव आणि जळगाव जामोद अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल तरी मात्र आगीच्या कारणांवर आता शंका उपस्थित होत आहेत. शहराच्या अगदी मोक्याच्या जागी असलेली ही शाळा इंग्रज कालीन असून यावर अनेक दिवसांपासून काही भूमाफियांचा डोळा असल्याने आता आगीच्या करणांबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत. शिवाय विधानसभा निवडणुकीचा बदला तर नाही ना असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे