आशाताई बच्छाव
भीषण अपघात ! झोपेची डुलकी? 30 प्रवाशांचे दैव बलवत्तर ! – समृद्धीवर पुन्हा D.N.R. एक्सप्रेस ट्रॅव्हल्स वाहनाला धडकली !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- देऊळगाव राजा समृद्धी महामार्गावर या ना त्या कारणाने अपघातांची मालिका सुरूच असते. 8 डिसेंबर रोजीमध्यरात्री 2 वाजता चॅनल नंबर 321 जवळील पोलीस स्टेशन किनगाव राजा हद्दीत चालकाला झोपेची डुलकी लागल्याने D.N.R. एक्सप्रेस ट्रॅव्हल्स अज्ञात वाहनाला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला. परंतु चालकाने नंतर वाहन नियंत्रित केल्याने 30 प्रवाशांचे दैव बलवत्तर होतं म्हणून ते बचावले!
चंद्रपूर वरून पुणे च्या दिशेने जात असलेली ट्रॅव्हल्स क्रमांक MH 34 BZ 86 77 चे चालक नदीम खान
वय 25 वर्षे रा. पळशी जिल्हा यवतमाळ याला
झोपेची डुलकी लागल्याने सदर ट्रॅव्हल्स समोर जात असलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकली. यामध्ये क्लीनर साईडचे ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून प्रवासी बचावले तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघात झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवून ट्रॅव्हल्स तात्काळ नियंत्रणात आणली व सर्व 30 प्रवासी यांचे प्राण वाचवले. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ महामार्ग अॅम्बुलन्स चे डॉक्टर वैभव बोराडे डॉक्टर यासीन शहा व चालक दिगंबर शिंदे यांनी जखमी अमोल लोढे, रोशन ठाकूर, विनायक दोडके, विना दोडके व चालक नदीम शहा यांच्यावर जागेवरच
प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील औषध उपचार कमी जालना येथे अॅम्बुलन्स द्वारे रवाना केले. तसेच महामार्ग पोलीस चे पीएसआय गजानन उज्जैनकर पोलीस कर्मचारी प्रवीण पोळ, गणेश उबाळे व एम एस एफ चे गायकवाड व स्टॉप यांनी महामार्गाने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सला थांबून सदर इतर प्रवासी यांना पुढील प्रवास करिता रवाना केले. तसेच क्यू आर व्ही वाहनाचे हनुमंत जायभाये, कन्हैया काळे, प्रदीप श्रीरामे, दिगंबर इंगोले, आदित्य गोपाळे यांनी सर्वांच्या मदतीने अपघात ग्रस्त ट्रॅव्हल्स क्रेनच्या मदतीने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच पुढील कारवाई पोलीस स्टेशन किनगाव राजा करीत आहे.