आशाताई बच्छाव
श्री.संताजी जगनाडे महाराजाचे विचार तेली समाजाने अंगीकृत करून तेली समाजात जागृती निर्माण करावी ….प्रमोदजी पिपरे
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्याने गडचिरोली लांजेडा,माडेतुकुम,बोधली,व खरपुंडी या ठिकाणी मा.प्रमोदजी पिपरे,जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली यांच्या अध्यक्षखाली कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मा.प्रमोदजी पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे.संताजी आपल्या वाणीने,लेखणीने,कर्तुत्वाने वैदिक धर्माचे,गीता धर्माचे पूर्ण जीवन भर समाजाच्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.यातील एक महान संत म्हणजे श्री.संताजी जगनाडे महाराज यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते.संताजी महाराज हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज ८ डिसेम्बर १६२४ रोजी तेली समाजात जन्म झाला.त्यांचे मुळ गाव महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातल्या मावळ तालुक्यातील संदुब्रे या गावी झाले.
आज या ठिकाणी श्री.संत जगणाडे महाराजाची समाधी व स्मारक उभे केले आहे.
संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा समाज कन्ठ्कानी इंदायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.परंतु हे सर्व गाथा संताजी महाराजांना मुखादेन म्हणजे तोंड पाठ होती म्हणून तुकारामांनी लिहिलेली गाथा जशी होती तशी त्यांनी ते पुन्हा लिहून काढली.संत तुकाराम महाराजांची मुखातून निघणारे अभंग आपल्या लेखणीने टिपून घेत असत,संत तुकाराम महाराजाची गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत समाज कंठकानी बुडवून दिले तेव्हा संताजी महाराजांनी तेरा दिवसात ती अभंग गाथा जशीच्या तशी तुकाराम महाराजाच्या स्वाधीन केली.अशा प्रकारे संत तुकाराम महाराजाच्या विचाराणा जिवंत ठेवण्याचे महान कार्य श्री.संत संताजी जगनाडे महाराजांनी केली.
एवढ्या मोठ्या थोर संताची तेली समाजात आठवण व्हावी व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजाला खूप काही घेणे असल्याने व तेली समाजाला जागृत संस्कृत करण्याचे काम गावागावातील तेली समाज संघटना केली पाहिजे असे आव्हाहन श्री.प्रमोदजी पिपरे केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.खासदार श्री.रामदासजी तडस,मा.आमदार श्री.चंद्रशेखर बावनकुळे,सरचिटणीस प्राध्यापक भुषणजी कर्डीले,सचिव बळवंतराव मोटघरे व विदर्भ अध्यक्ष जगदीशजी वैद्य यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारला संताजी आर्थिक विकास महामंडळ मंजूर करण्या करिता पाठपुरावा केला व तत्कालीन उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी तेली समाजाच्या नागरिकांना कानी व्याज दारात कर्ज व इतर सुख सोई मिळन्या करिता संताजी आर्थिक विकास महामंडळा ला मंजुरी दिली व ,महाराष्ट्रतील प्रत्येक तालुक्यात ओबीसी विद्यार्थ्यां साठी वस्तीगृहाला मंजुरी देऊन चालू करण्यात आले.हि फार तेली समाजाला मोठी उपलब्धी मिळाली.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून माजी.आमदार श्री.नामदेवजी उसेंडी,माजी,नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महा.प्रा तेली महासभा सौ.योगीताताई पिपरे,श्री,देवाजी सोनटके सर,श्री,भैयाजी सोमणकर,श्री.प्रकाशजी गेडाम,श्री.डॉ गजाननजी बुरांडे,श्री.रमेशजी भुरसे,श्री.धनेशजी कुकडे,श्री.वामनजी क्षीरसागर,श्री.श्रावणजी बोबाटे,श्री.भाऊराव सोमणकर,भास्कर नैताम,सुधाकर नैताम,अतुल चलाख,रमेश नैताम जीवन बुरांडे,केतन भांडेकर तुलाराम नैताम,विक्की नैताम ,आबाजी चिचघरे,बेबीताई चिचघरे,पटले सर,नंदू कुनघाडकर,दिनेश आकरे,बुरले गुरुजी व बहुसंख्येने तेली समाजातील युवक
युवती व नागरिक उपस्थित होते.