आशाताई बच्छाव
पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी शेख असलम यांची नियुक्ती.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड देगलूर –पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुकाध्यक्ष पदी युवा पत्रकार शेख असलम यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली.
पत्रकार संरक्षण समिती हि संपूर्ण राज्यात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढा देत असून नांदेड जिल्ह्यात हि पत्रकार संरक्षण समितीचे मोठे कार्य आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम पत्रकार संरक्षण समिती करीतआहे. संपूर्ण जिल्ह्यात समितीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली असून देगलूर येथील युवा पत्रकार शेख असलम यांची देगलूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते हि निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नामदेव कांबळे, पत्रकार कुलदीप सूर्यवंशी, पत्रकार रियाज अत्तार, यांची उपस्थिती होती. पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हासचिव शशिकांत पाटील गाडे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आशिष देशपांडे, जिल्हासहसचिव शेख रफिक यांच्यासह अनेकांनी शेख असलम यांच्या निवडीचे अभिनंदन केले आहे.