आशाताई बच्छाव
भारतीय सैनिकाचा स्तुत्य उपक्रम, महापुरुषांना स्मरुण ‘सत्यशोधक पध्दतीने गृहप्रवेश’
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 09/12/2024
जालना शहरातील गायत्री नगरामध्ये वाघ्रळ ता.जालना येथील सौ.सुमन राधाकिसन खरात व श्री.राधाकिसन एकनाथ खरात यांचे भारतीय सैन्यात कार्यरत चिरंजीव श्री.अशोक राधाकिसन खरात व सौ.अनिता अशोकराव खरात यांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या उत्साहात आनंदाने सत्यशोधक पद्धतीने दिनांक 08/12/2024रोजी गृहप्रवेश केला.गृहप्रवेश करतांना कुलदैवत पंढरीचा विठ्ठल पांडुरंग,महान सम्राट बळीराजा, विज्ञानवादी संत सावता महाराज,राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले,ज्ञानाई सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मरण करून पुजन करण्यात आले.अवैज्ञानिक प्रथापरंपरांना व विचारांना बाजूला सारून खरात कुटुंबाने समाजापुढे एक वैचारीक आदर्श ठेवला आहे.या कुटुंबाने मागील वर्षी मुलीचे लग्न सुध्दा सत्यशोधक पध्दतीने केले होते. उपस्थित नातेवाईक,मित्रमंडळी व शेजाऱ्यांनी सत्यशोधक पध्दतीचे व खरात कौटुंबाचे सत्यशोधक आचरणाचे कौतुक केले.
सत्यशोधक विधीची सुरुवात महात्मा जोतीराव फुले यांच्या *सत्य सर्वांचे आधी घर,सर्व धर्माचे माहेर* या अखंडाने करण्यात आली.यजमान श्री.अशोक खरात व नातेवाईकातील चार बांधवांच्या हस्ते खंडेरायाची तळी उचलून कुलदैवतांचा जयजयकार करण्यात आला. प्रसंगी विधी कर्ते मौर्य आकाश मेहेत्रे सिंदखेड राजा व प्रा.डॉ. कृष्णा मालकर संभाजी नगर यांनी उपस्थित बांधवांना सत्यशोधक पद्धतीचे महत्त्व व सांस्कृतिक गुलामीतून बाहेर पडण्यासाठीचे महत्व समजून सांगितले.
प्रा.डॉ. कृष्णा मालकर यांनी सत्यशोधक पद्धत ही कृषी संस्कृतीतून विकसित झालेल्या सण उत्सवाप्रमाणे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आधारित आहे. या मुलनिवासी पद्धतीने भारतीयांमध्ये प्रेम,सदभाव,समता,स्वातंत्र, बंधुत्व कसे विकसित केले हे समजून सांगितले. तर विधीकर्ते आकाश मेहेत्रे यांनी महापुरुषांचे विचार दैनंदिन जीवनात अंगीकारूनच आपण आपली व समाजाची प्रगती करू शकतो व बुवाबाजीला बाजूला सारून संत सावता महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे *स्वकर्मी व्हावे रत | मोक्षमिळे हातोहात ||* या पद्धतीचे आचरण आपण करणे गरजेचे आहे हे उपस्थित बांधवांना समजून सांगितले.
कार्यक्रमाला असताना नगरीतील प्रतिष्ठित समाज रत्न,समाजभूषण श्री.भास्कररावजी आंबेकर,जिल्हा शिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब खरात अँड श्री.अशोक खरात,श्री. वैजिनाथ घडलिंग,श्री.प्रभाकरजी घडलिंग,श्री.संतोष खरात,श्री.शिला गणेश खरात,श्री.गणेश खरात,जयश्री हरी खरात,सौ.अनुजा खरात,सौ.अनिता मेहेत्रे व सर्व परिसरातील नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते.