Home भंडारा युवकांनी शिक्षणाबरोबर रोजगार क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानांचा वापर करा -नुरुल...

युवकांनी शिक्षणाबरोबर रोजगार क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानांचा वापर करा -नुरुल हसन जिल्हा पोलिस अधिक्षक

16
0

आशाताई बच्छाव

1001030489.jpg

युवकांनी शिक्षणाबरोबर रोजगार क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानांचा वापर करा -नुरुल हसन जिल्हा पोलिस अधिक्षक

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत दरवर्षी युवा महोत्सवाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजन करण्यात येत असते. सन 2024-25 यावर्षात संयुक्त राष्ट्र संघाने “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना ” “Innovation in Science and Technology” हि संकल्पना दिलेली आहे.
या संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2024-25 चे आयोजन दि.02 डिसेंबर, 2024 रोजी पोलीस कल्याणकारी सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नरुल हसन, जिल्हापोलीस अधिक्षक भंडारा, हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. व त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकेतून श्रीमती. लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महत्व विशद केले. नरुल हसन, पोलीस अधिक्षक, यांनी उद्घाटनीय भाषणातून युवक हे देशाचा आधारस्तंभ असून राष्ट्र उभारणीस युवकांची भुमिका महत्वाची आहे,तरी युवकांनी शिक्षणाबरोबरच रोजगार क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाचा विकास करावा असे प्रतिपादन केले.
सदर स्पर्धेकरीता पंच म्हणून डॉ. राजेंद्र शहा, प्रा. भोजराज श्रीरामे, कार्तीक मेश्राम, प्रा. शाहिद अक्तर, डॉ. ज्योती नाकतोडे, डॉ. आम्रपाली भिवगडे, श्रीमती. रेखा पटले, श्रीमती. पुष्पा काटेखाये, प्रशांत वालदेव, राहुल हुमणे, अतुल गेडाम, रोहीत वाघ यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा उत्साही वातारणात संपन्न झाल्या असून विभागीय युवा महोत्सवाकरीता
समुह लोकगित गांधी विद्यालय कोंढा पवनी प्रथम 1,
समुह लोकनृत्य गांधी विद्यालय कोंढा पवनी- प्रथम 2,
कविता मेघा मिश्रा, जे. एम. पटेल महा. भंडारा 3,
प्रथम कथालेखन- लोकेश लोहबरे ओम सत्यसाई परसोडी प्रथम, वक्तृत्व-ओम फुंडे, गांधी विद्यालय कोंढा पवनी,
फोटोग्राफी – डिंपल विजय कापगते प्रथम,
चित्रकला तन्मय केशव येलमुले, गांधी विद्यालय पहेला,
सायन्स मेला प्रदर्शन (सांघीक) महिला समाज भंडारा यांची चमू,
सायन्स मेला प्रदर्शन वैयक्तीक सुलोचनादेवी पारधी विद्या.मोहाडी ,याची निवड झाली असून विजयी संघ कलाकारांना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे,यांनी शुभेच्छा दिल्या.युवा महोत्सवाचे संचालन रोहीत वाघ,तर आभार प्रदर्शन रमेश अहीरकर,यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आकाश गायकवाड,की. अ. निखिलेश तभाने,की.अ. पराग गावंडे,प्रतिक लाडे,प्रविण देसाई,राजेंद्र सावरबाधे,सुरज लेंडे,सुधिर गळमळे,अतुल गजभिये,रामभाऊ धुडसे,यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दिले ,हातचे काहीही राखून ठेवलेले नाही- ग्यानचंद जांभुळकर
Next articleवाटे हळूहळू चाला मुखाने राम राम बोल सिद्ध साक्षी आनंद धाम किटाळीचा चित्तवेधक उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here