आशाताई बच्छाव
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दिले ,हातचे काहीही राखून ठेवलेले नाही- ग्यानचंद जांभुळकर
महापरिनिर्वाण दिनानिमित्त देसाईगंज वडसा येथे करण्यात आले होते आयोजन
गडचिरोली ( संजीव भांबोरे) दिनांक 6 डिसेंबर 2024 सायंकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पद स्पर्श भूमी दीक्षाभूमी वडसा देसाईगंज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वानाच्या कार्यक्रम संमेक जागृती महिला मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम धर्माजी शहारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुजबी हे होते.
आपल्या दोन तासाच्या भाषणामध्ये जांभूळकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महान व्यक्तिमत्व होते.जगामध्ये सहा विद्वान झालेले आहेत अमेरिका अब्राहम लिंकन जर्मनी कार्ल मार्क्स रसिया रुसो चीन मांटो तर भारतातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्या सहा विद्वाना पैकी सर्वात विद्वान कोण तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर .
बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाकडे किंवा मुलांकडे जास्त लक्ष न देता आपल्या समाजाकडे लक्ष दिलेला आहे बाबासाहेबांची चार-चार लेकर अन्न पाण्याविना औषध पाण्याविना निधन झालेले आहे. आज त्यांच्या मुलांना औषध भेटली नाही म्हणून आपणास मिळते. त्यांच्या मुलांना अन्न मिळालं नाही म्हणून आपणास मिळते. बाबासाहेबांमुळे आज आपल्याकडे गाडी आहे माडी आहे मान सन्मानाच्या खुर्च्या आहेत सहा सहा आकड्यांमध्ये आज आम्ही पगार घेत आहोत हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेला आहे .
आज समाजा मधल्या प्रगतीमुळे काही मनुवादी लोक आपणास जळत आहेत. बाबासाहेबांच्या न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ह्या लोकशाही मूल्यांना कुठेतरी तडा गेल्यासारखा वाटतो यासाठी आपणास संघर्ष करणे गरजेचे आहे .
तुमचा मुलगा डॉक्टर झाला हे मनुवाद्यांचे दुखणे आहे. तुमचा पोरगा वकील झाला हे त्यांचे दुखणेआहे. तुमचा पोरगा आयपीएस झाला हे त्यांचे दुखणे आहे. तुमचा पोरगा आयआयटी झाला हे त्यांचे दुखणे आहे तुमचा पोरगा आयआयएम झाला हे त्यांचे दुखणे आहे तुमचा पोरगा यूपीएससी पास होतो हे त्यांचे दुखणे आहे तुमचा पोरगा एमपीएससी पास होतो हे त्यांचे दुखणे आहे.
आज खाजगीकरणामुळे आरक्षण संपलेला आहे हे आरक्षण वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी एकत्र येऊन राजकीय पुढाऱ्यांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीचे भले नाही .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सतीश हरिदास डांगे ब्रह्मपुरी राऊत साहेब वडसा टेंभुर्णे साहेब वडसा उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुंदर आयोजन मारोतीजी जांभूळकर व त्यांच्या टीमने केलेले होते .कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रामटेके मॅडम यांनी केले.