Home गडचिरोली माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीची जिल्हा बैठक संपन्न

माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीची जिल्हा बैठक संपन्न

92
0

आशाताई बच्छाव

1001030472.jpg

माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीची जिल्हा बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री महेश सारणीकर यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे माहितीचा अधिकार या विषयावर संबोधन

जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्या हस्ते माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या जिल्हा सचिव पदि रोशन कवाडकर यांची नियुक्ती करून नवनियूक्त प्रतिनिधीना आयकार्ड वाटप

 

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: गडचिरोली येथिल शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा बैठक घेण्यात आली या बैठकिला महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश सारणीकर यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्वांना संबोधित करताना प्रशासकिय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब , सहजत्या व्हावीत यासाठी माहिती अधिकार या कायद्याची निर्मिती झाली.माहिती अधिकाराचा वापर करत असतांना सार्वजनिक प्रश्नासाठी करावा तसेच वैयक्तिक कुठल्याही लाभासाठि किंव्हा अवासापोटि माहिती अधिकाराचा वापर करू नये असा महत्वपूर्ण सल्ला समितीचे अध्यक्ष श्री महेश सानिरकर सर यांनी दिला.

माहिती अधिकार म्हणजे कोणत्याही शासकीय ,अनूदानीत कार्यालयाकडे असलेली किंव्हा त्याच्या यंञनाखाली असलेली व नियमानूसार मिळवता येण्याजोगी माहिती.आवश्यक अशी माहिती जाणून घेणे,त्याची कागदपत्र मिळविणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे, मूळ उद्देश,नागरिकांना सक्षम करणे,सरकारी कामकाजात पारदर्शकतेला व जवाबदारी ला चालना देणे,आणि उत्तरदायित्व वाढविणे,भ्रष्टाचाराला आळा घालणे ,आपली लोकशाही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करणे ,सरकारी कर्मचारी कसे कार्य करते,ती कोणती भूमिका बचावते,त्याचे कार्य काय आहेत, कामाचा आढावा ,माहिती अधिकार कायद्याची दिशा व दशा, त्याची रीतसर प्रक्रिया पध्दत,दप्त्तर दिरंगाई, इत्यादी विषयावर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीचे संचालन व नियोजन जिल्हा उपाध्यक्ष सुरज गुंडमर यांनी केला व मीटिंगचे समारोप जिल्हा सचिव रोशन कवाडकर यांनी केलेे,या बैठकीमध्ये जिल्ह्यातील समितीचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.

Previous articleश्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदिरानगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
Next articleडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दिले ,हातचे काहीही राखून ठेवलेले नाही- ग्यानचंद जांभुळकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here