Home उतर महाराष्ट्र सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या धुळे जिल्हा समन्वयक पदी वासखेडी गावाचे...

सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या धुळे जिल्हा समन्वयक पदी वासखेडी गावाचे उपसरपंच दिपक जाधव यांची स्तुत्य निवड….

36
0

आशाताई बच्छाव

1001016892.jpg

सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या धुळे जिल्हा समन्वयक पदी वासखेडी गावाचे उपसरपंच दिपक जाधव यांची स्तुत्य निवड….

वासखेडी – येथील महाराष्ट्र राज्यातील सरपंचांच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकमेव कार्यतत्पर असणारी संघटना सरपंच परीषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या धुळे जिल्हा समन्वयक पदी वासखेडी गावाचे युवा उपसरपंच दिपक जाधव यांची योग्यता पाहता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, व बापुसाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सदरील संघटनेच्या निवडीचे पत्र देवुन संघटनेच्या धुळे जिल्ह्यातील समन्वयक पदी दिपक जाधव यांची स्तुत्य निवड करण्यात आली,सक्षम ग्रामपंचायत, कार्यतत्पर सरपंच , उपसरपंच तथा सदस्य यांच्या विविध समस्यांचे निराकरण तसेच शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील प्रत्येक गावांसाठी विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून सदैव कार्यरत राहुन गावाचा विकास करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत व गावगाडा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याकरिता सदैव कटिबध्द राहाल..या करिता आपली धुळे जिल्हा समन्वयक पदी एकमताने निवड करण्यात येत असुन, पुढील वाटचालीसाठी व संघटनेच्या वाढीसाठी सदैव आम्ही आपल्या सोबतीला आहोत,ही ग्वाही देवुन प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व बापुसाहेब जगदाळे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,या निवडीसाठी परीसरातुन तसेच जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते , ज्येष्ठ नागरिक आदींनी शुभेच्छांचा वर्षाव करत ,भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here