आशाताई बच्छाव
दुय्यम कारागृहातील कैद्यांना जेवण व पाणी पुरविण्यासाठी
इच्छुकांनी 16 डिसेंबरपूर्वी निविदा सादर कराव्यात
: विशाल सोनवणे
मालेगाव, दि. 5 डिसेंबर, 2024 (उमाका वृत्तसेवा):
मालेगाव येथील दुय्यम कारागृहातील कैद्यांना सकाळी चहा, नाश्ता व दोन वेळचे शिजवलेले जेवण, पिण्याचे पाणी आणि अंघोळीचे पाणी पुरविण्याच्या मक्ता देण्यासाठी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने इच्छुकांनी सकाळी चहा, नाश्ता व दोन वेळचे शिजवलेले जेवण, पिण्याचे पाणी आणि अंघोळीचे पाणी यावर स्वतंत्र दर कागदावर नमूद करुन निविदा फॉर्मसह सिलबंद पाकिटात अटी व शर्तीची पुर्तता करुन निविदा 16 डिसेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत तहसिलदार तथा दुय्यम कारागृह अधिक्षक मालेगाव या कार्यालयात पाठविण्यात यावेत, असे आवाहन मालेगावचे तहसिलदार तथा, दुय्यम कारागृह अधिक्षक विशाल सोनवणे व तुरुंगाधिकारी प्रदीप भारस्कर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
प्राप्त निविदा 16 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता नवीन तहसिल कार्यालय, कॉलेज ग्राऊंडजवळ, मालेगाव येथे सर्व शर्तीद्वारे समक्ष उघडण्यात येतील. या निविदा उघडते वेळी सर्व संबंधित अर्जदार अथवा ठेकेदार यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन तहसिलदार मालेगाव तथा, दुय्यम कारागृह अधिक्षक श्री. सोनवणे यांनी केले आहे.