आशाताई बच्छाव
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड. राष्ट्रीय अध्यक्षपदी मनोहर सुने तर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी युसुफ खान यांची निवड.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
याविषयी सविस्तर माहिती अशी की, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अजीव सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी चांदुर रेल्वे परिसरातील हॉटेल गोविंद वाडा येथील हॉलमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी मनोहर सुने यांची तर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी युसुफ खान यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, राष्ट्रीय संघटक -कैलास बापू देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस- सुरेश सवळे, राष्ट्रीय चिटणीस- अशोक पवार, राष्ट्रीय महिला संघटक -सौ जयश्री पंडागळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष- अशोक याउल, राष्ट्रीय प्रवक्ता -माणिकराव ठाकरे, राष्ट्रीय विधी सल्लागार- सौ. किरण भुते, राष्ट्रीय सदस्य- अंबादास सिनकर ,बाळासाहेब सोरगीवकर,प्राध्यापक रवींद्र मेंढे, अभिमन्यू भगत यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख ,राज्य संघटक -संजय कदम, अंबादास सिनकर ,राष्ट्रीय कार्यालय प्रमुख पदी बाबाराव खडसे यांची निवड करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.