आशाताई बच्छाव
सुखलालजी कुंकलोळ यांचे निधन
जालना : येथील प्रतिष्ठीत तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सुखलालजी फत्तेलालजी कुंकलोळ (जैन) यांचे आज संथारा निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कचरुलाल व कुशल ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सुखलालजी कुंकलोळ (जैन) यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील रिता मेत्रेवार आणि तहसीलदार छाया पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. श्री. सुखलालजी जैन यांनी स्वातंत्र्य सैनिक, श्री स्थानकवासी जैन श्रावक संघ, गुरु गणेश अंध विद्यालय. भारत स्काऊट गाईड, रेड स्वस्तिक सोसायटीसह अनेक पदावर पदाधिकारी राहिलेल्या सुखलालजी जैन समाजाचे मोठे योगदान राहिलेले आहे. आज मंगळवारी सकाळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सुखलालजी कुंकलोळ (जैन) यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळी राजकीय, पत्रकार, वकील, डॉक्टरांसह विविध स्तरातील नामवंताबरोबरच सामान्य नागरीकांची देखील मोठी उपस्थिती होती. श्री. सुखलालजी जैन यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.