आशाताई बच्छाव
अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव खैरे तर सचिवपदी डॉ. अर्जुन शेळके यांची
एकमताने बिनविरोध
बदनापूर,/जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ.)- तालुक्यातील वैद्यकीय सेवा बजावणार्या
डॉक्टरांना एकत्रित करणार्या डॉक्टर्स असोसिएशनची स्थापना केलेली असून
या असोसिएशनमार्फत विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची नव्याने बांधणी
करण्यात येऊन अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव खैरे तर सचिव पदी डॉ. अर्जुन
शेळके यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
बदनापूर तालुक्यातील वैद्यकीय सेवा देणार्या सर्व डॉक्टर्सनी एकत्रित
येऊन संघटना स्थापन केलेली असून मागील वर्षी जाहीर झालेल्या
कार्यकारिणीने उत्कृष्ट काम करत असोसिएशनच्या कामाचा ठसा उमटवला होता.
नुकतीच तालुक्यातील सर्व डाक्टर्सची बैठक झाली. या बैठकीत मागील वर्षी
झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. मागील कार्यकारिणीने केलेल्या
उत्कृष्ट कामामुळे तिच कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने
घेण्यात आला. तालुका कार्यकारिणी जाहीर करून असोसिएशनच्या माध्यमातून
सामाजिक कार्य आणखी जोमाने करण्याचे ठरवण्यात आले.
या वेळी जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी डॉ. अरुण शंकरराव
खैरे, उपाध्यक्षपदी डॉ. किरण जर्हाड, सचिवपदी डॉ. अर्जुन शेळके. तर
कोषाध्यक्ष म्हणून डॉ. गौरव तातेड यांची निवड करण्यात आली. डॉ. अविनाश
गाभणे, डॉ. संतोष वाघ व डॉ. शिवा गायकवाड यांनी आहे त्याच
कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांना कायम ठेवावे, त्यांनी चांगले काम केले
आहे असा प्रस्ताव बैठकीत ठेवला असता उपस्थितांनी अनुमोदन देत सदरील
कार्यकारिणी बिनविरोध जाहीर केली. याच वेळी क्रीडा सचिव म्हणून डॉ.
प्रदीप कदम, सांस्कृतिक सचिव (महिला प्रतिनिधी) डॉ. अस्मिता खैरे, डॉ.
अश्विनी गायकवाड, डॉ. कृष्ण सरोदे, आदी उपस्थित होते.