आशाताई बच्छाव
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवून दिव्यांगांनी देशाचे नाव
उज्वल केले -शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील
जालना, प्रतिनिधी दिलीप बोंडे) -राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध
क्रीडा स्पर्धा व क्षेत्रात पदके मिळवून दिव्यांगांनी देशाचं नावलौकिक
केलं ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचे जालना जिल्हा सामान्य
रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील म्हणाले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सक्षम पालक संघ व समदृष्टी क्षमता विकास
अनुसंधान मंडळ यांच्या वतीने शहरातील संभाजीनगर भागातील शांतिनिकेतन
विद्यामंदिर या शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, डॉ.अरविंद नाईक,
प्रा.डॉ.सुरेश कांगणे, डॉ.अशोक सिनगारे, डॉ.राजेंद्र कदम, मनीषा गायकवाड,
नागेश पिंपरकर, विनोद कुमावत, रविकांत जगधने यांच्यासह कार्यक्रमाचे
मुख्य मार्गदर्शक व आयोजक डॉ.निकेश मदारे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आदित्य घुले यांच्यासह सतीश
वाघ, बळीराम तिडके, खुशी वाघमारे, शिवकन्या शेरकर, ऋतुजा सोरमारे आदींचा
सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुढे बोलताना डॉ.पाटील पुढे
म्हणाले की, समाजाने दिव्यांगाकडे अत्यंत डोळसपणे पहावे. अनेक जन
दिव्यांग असूनही वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवत आहेत. त्यांच्या अंगी
असणारी जिद्द जीवनाकडे पाहण्याची त्यांची सकारात्मक भावना ही अत्यंत
महत्त्वाची आहे. दिव्यांगास प्रत्येकाने सहकार्य करावे, त्यांना कमी लेखू
नये. त्यांची कुठेही अवहेलना होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. आज
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दिव्यांगांनी विविध स्पर्धांमध्ये पदक
मिळवून दिली. देशाचा नावलौकिक केला.