Home बुलढाणा सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक थोरवेची अरेरावी, मि आमदार मनोज...

सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक थोरवेची अरेरावी, मि आमदार मनोज कायंदे चा नातेवाईक असल्याचा बतावणी

17
0

आशाताई बच्छाव

1001014092.jpg

सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक थोरवेची अरेरावी, मि आमदार मनोज कायंदे चा नातेवाईक असल्याचा बतावणी करून शेतकऱ्यास धमकावणे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, पत्रकार अनिल दराडे ची भूमी उपअधीक्षकाकडे तक्रार
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-सिंदखेडराजा तालुक्यातील नवनियुक्त आमदार मनोज कायंदे यांचा शपथविधी होण्याअगोदर शासकीय कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख विभागात दिसून येत असून कर्मचाऱ्यांची तक्रार भूमी उपअधीक्षक यांच्या कडे दिली असून ते काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे
मुख्यालय सहायक मारोती थोरवे हा वंजारी समाजाचा असल्याने मी आमदार मनोज कायंदे यांचा जवळचा नातेवाईक असल्याचा आव आणून या कार्यालयात सतत गैरहजर राहणे व हजर असल्यावर शेतकऱ्यांकडून शेत मोजणीचे जादा पैसे घेणे व जास्त पैसे घेतल्यावर विचारल्यावर मी आमदाराचा नातेवाईक असल्याची बतावणी करून शेतकऱ्यास धमकावणे असे प्रकार सुरू आहे
भूमी अभिलेख कार्यालय यांच्या अनागोंदी कारभारा वर कार्यवाही करणे तसेच इतर शेतकऱ्यांकडून पैश्याशिवाय काम न करण्या संदर्भात कार्यवाही होणे बाबत .. सिंदखेडराजा एकनाथ माळेकर दूसरबीड ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा यांनी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली असून या तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की
आपल्या कार्यालयामध्ये मारोती थोरवे मुख्यालय साहयक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारी हा कार्यालया मध्ये वेळेवर हजर राहत नसून ज्याही दिवशी हजर राहतो त्या दिवशी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्या शिवाय कोणतेच कागद पत्र देण्यास टाळाटाळ करत असतो तसेच मी वंजारी समाजाचा असून माझे नवनिर्वाचित आमदार नातेवाईक असल्याचे बतावणी करून शेकऱ्यांना धमकावत असतो.
ऑफिस मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. टॉयलेट ची दुरावस्था झाली आहे. त्यामधून अत्यंत दुरगंधी येत असते. स्वच्छतेसाठी येणारा आर्थिक निधी हा खर्च करत नाही. या सह सिंदखेड राजा भूमी अभिलेख कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोजणी उलटसुलट करून दिल्या आहे. त्यासाठी हा इतरांकडून जास्तीचे रुपये घेत असल्याचे दिसून येत आहे.
यासह अनेक बाबींकडे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी मी आपणास मारोती थोरवे यांची तक्रार देत आहे. तरी माननीय अधिकारी साहेबांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तक्रारीत कार्यवाही करावी करिता अर्ज सादर…. केलेल्या कार्यवाही संदर्भात मला पत्र देऊन अवगत करावे…..
असे म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here