आशाताई बच्छाव
वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार परिचारिकेंच्या भरोशावर, चोवीस तास डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून सुद्धा आरोग्य सुविधेचा वानवा पाहायला मिळत आहे. कारण, आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने या आरोग्य केंद्राची जबाबदारी परिचारिकेवर पडत आहे. तसेच रात्री-अपरात्री जर एखादा पेशंट आरोग्य केंद्रात आला तर त्याची डॉक्टराविना गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला रुग्ण वैतागले असून, 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध असावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वरवंडसह २० खेड्यातील रुग्ण उपचाराला येतात. मात्र, या केंद्राची अवस्था
दोन डॉक्टर असून सुद्धा नर्सच्या भरोशावर कारभार सुरु आहे. तसेच डॉक्टरांना राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवासस्थानाची व्यवस्था असतानाही डॉक्टर तिथे राहत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळेस येणाऱ्या रुग्णांचे उपचार नर्सेस करत असून, फोनवरून रुग्णाची माहिती डॉक्टरांना दिली जाते व डॉक्टर फोनवरून काय उपचार करायचे याबद्दल नर्सेसला माहिती देतात. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मनात आरोग्य केंद्राबद्दल भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.याच बरोबर दवाखान्यात रात्रीच्या वेळी येणाऱ्या रुग्णांना नर्सेस डॉक्टरांविना उपचार करतात, ही बाब धक्कादायक असून, यावेळी कोणता प्रसंग ओढवला तर याला जबाबदार कोण?, अशाप्रकारे बेजबाबदारपणे उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु आहे.आता तर चक्क या ठिकाणी दहा ते पंधरा महिलांनी कुटुंब नियोजन चे ऑपरेशन केलेले आहे तरी या महिलांची जबाबदारी ही सुद्धा परिचारिकाच्या भरोशावरच दिसत आहेत. डॉक्टर सकाळी दहा वाजता दवाखान्यात मध्ये येतात व बारा ते एकच्या दरम्यान घरी जातात अशी माहिती दवाखान्यातीलच कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली या अगोदरही कित्येक वेळा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या….