आशाताई बच्छाव
वृंदावनमधील केशव धाम येथे श्री कृष्ण जन्मभूमी मथुरा मुक्ती आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय धर्म संसद आयोजित.
दैनिकयुवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
वृंदावनच्या केशव धाममध्ये बुधवारी श्री कृष्ण जन्मभूमी मथुरा मुक्ती आंदोलनाची कार्यदिशा ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय धर्म संसद आयोजित करण्यात आली. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून कलकी पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्ण, गीता मनीषी स्वामी ज्ञानानंद जी महाराज, श्री गोविंद आनंद तीर्थ महाराज, स्वामी उमेश योगी (स्पेन), तसेच जगद्गुरू रामानंदाचार्य राजेश्वरमाऊली सरकार यांसह अनेक संत उपस्थित होते.
सभेत उपस्थित संतांनी पुरातत्त्व विभागाकडून (एएसआय) मथुरातील श्री कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. यासंदर्भात याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी दिली. त्यांनी म्हटले की, मशिदीची सत्यता लवकरच जगासमोर येणे हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे.
“जात तोडा, समाज जोडा” अभियान सुरू करण्याचा निर्णय
जगभरात हिंदू धर्मीय राहत असूनही जात-पातीच्या बंधनातून मुक्त होऊन सर्वांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी “जात तोडा, समाज जोडा” अभियान संपूर्ण जगभरात राबवले जाणार आहे. तसेच श्री कृष्ण जन्मभूमीची मुक्ती करून भव्य मंदिर निर्माण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गाय व मठ-मंदिरांचे रक्षण करण्याचा निर्धार
संतांनी गायींशी संबंधित प्रश्न तसेच मठ व मंदिरांचे रक्षण करण्यासाठी अभियान राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
भव्य मंदिर निर्माणासाठी संघर्षाची हाक
श्री रुक्मिणी पीठाधीश्वर पूजनीय जगद्गुरू राजेश्वरमाऊली सरकार म्हणाले, “भारतामध्ये आम्ही अथक प्रयत्नांनंतर प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राप्त केली आहे. जसे चीनचा देश चीन, अमेरिकेचा देश अमेरिका आहे, तसे हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र म्हणण्यास काय हरकत आहे? येथे सनातन धर्माचे पुरावे आहेत, वेद, उपनिषद, भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांचे अस्तित्व आहे. श्री कृष्ण जन्मस्थानाचा प्रत्येक इंच मंदिराचे पुरावे देतो.
सनातनी आता जागृत झाले आहेत. संघर्षाशिवाय आपले अधिकार मिळत नाहीत, हे आपण याआधीही पाहिले आहे, आणि यापुढेही संघर्ष करावा लागेल. मात्र, आमचा मार्ग अहिंसेचा व संविधानाच्या मार्गाने चालणारा आहे. भारतीय संविधानाच्या कक्षेत राहून आम्ही लढा देऊ व आपल्या आराध्य श्रीकृष्ण जन्मभूमीचे भव्य दिव्य मंदिर निर्माण करू.”