आशाताई बच्छाव
राज्यस्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धेत जालना जिल्ह्या दुसर्या स्थानावर
मोहीत मोरेची राज्य संघात निवड
जालना/प्रतिनीधी दिलीप बोंडे – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजीत 17 वर्षाआतील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धेत चुरशीच्या लढतीत जालना जिल्हा संघ दुसर्या स्थानावर राहीला, तर प्रथम क्रंमाकावर नागपुर जिल्हा राहीला.
शालेय राज्यस्तरीय सेपाक स्पर्धेत जालना जिल्हा दुसर्या संघावर राहण्याची हि पहीलीच वेळ आहे, जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे प्रशिक्षक अमोल काटकर यांच्या अथक प्रयत्नाने जिल्हा संघाने हे दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे.
जालना जिल्हा संघात ऋषी विद्या एज्युकेशनल स्कुलचे खेळाडु मोहीत मोरे, विराज शेजुळ, प्रणव राठोड, समर्थ खुरपे, रूद्रवीर बागल यांचा समावेश आहे, यापैकी मोहीत मोरे याची मणीपुर येथे होणार्या राष्ट्रीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेली आहे.
संघाच्या यशाबद्दल व मोहीत मोरे याची राज्य संघात निवड झाल्याबद्दल जालना जिल्हा सेपाक टाकरा असोसिएशनचे अध्यक्ष शेख इब्राहीम, सचिव शेख चाँद पी.जे., असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच ऋषी विद्या एज्युकेशनल स्कुलच्या एम.डी. शितल भाला, प्रिंसीपल डॉ. हेमा सोनटक्के, हेडमिस्ट्रेस प्रतीमा गोरंट्याल, व्हाईस प्रिंसीपल यशवंत ढोलके, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. तुलजेश भुरेवाल यांनी अभिनंदन केले आहे.