आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यात ठो ठो आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकीवर पोलिसांची दणादण कारवाई
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि: २९ नोव्हेंबर २०२४ जिल्ह्याभरात ठो ठो असा मोठा आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकी च्या सायलेन्सरवर कारवाई करून या सायलेंसरवर रोलर फिरवण्यात आले. यामुळे बुलेट दुचाकी धारकांमध्ये धाक निर्माण झालेला दिसत असून, या कारवाया नियमित सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी सांगितले आहे. जिल्हा वाहतूक शाखेने जिल्हाभरातील बीड, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी सह आदी शहरात बुलेटचा ठो ठो असा मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविण्यात आलेल्या १०० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करून सायलेंन्सर जप्त करण्यात आले होते. या सायलेन्सरवर रोलर फिरवून नष्ट करण्यात आले. ही कारवाई गुरुवार दि.२८ रोजी सायंकाळी करण्यात आली. तसेच फॅन्सी नंबर, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना सीट बेल्ट, अतिरिक्त प्रवासी, विना लायसन वाहन चालविणे यासह विविध कारवाया करण्यात आल्या आहेत. बुलेट दुचाकी च्या सायलेंन्सरवर चक्क रोलर चालविण्यात आल्याने बुलेट धारकांनी या कारवाईचा चांगला धसका घेतल्याचे दिसून येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने केली आहे.