Home बुलढाणा पॉलिटिक्स! कोण – कोण डरकाळी फोडणार? – आज खा. राहुल गांधी, मुख्यमंत्री...

पॉलिटिक्स! कोण – कोण डरकाळी फोडणार? – आज खा. राहुल गांधी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात ! – बड्या नेत्यांच्या बड्या सभेकडे जिल्हावासियांचे लक्ष!

21
0

आशाताई बच्छाव

1000952049.jpg

पॉलिटिक्स! कोण – कोण डरकाळी फोडणार? – आज खा. राहुल गांधी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात ! – बड्या नेत्यांच्या बड्या सभेकडे जिल्हावासियांचे लक्ष!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा बड्या नेत्यांच्या बड्या सभांचा धडाका तत्पूर्वी सुरू झाला असून आज दिग्गज नेत्यांच्या सभा आणखी विधानसभा निवडणुकीत रंग भरणार असून आवाज कुणाचा गुंजतोय? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
बुलढाणा, मेहकर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन सुरुवात केली. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मलकापूर मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतली. मेहकरात वंचितचे सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील
सभा घेऊन तोफ डागली. तर आज देखील चिखलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी सभा घेत आहेत. सकाळी 11 वाजता जाफराबाद रोडवरील बोंद्रे यांच्या वीट भट्टी जवळ ही जाहीर सभा होईल. तसेच मेहकर येथे आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ सकाळी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. दुपारी तीन वाजता देऊळगाव राजा येथेही डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंदखेड राजा येथे सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होऊ घातली आहे.

Previous articleयुवा मराठा खळबळजनक ब्रेकिंग वाघजाळ फाट्यावर पकडली एक कोटींची कॅश
Next articleवसमत विधानसभेत विद्यमान आमदार राजू नवघरे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here