Home जालना विकासाचे गाजर दाखवून राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीतील  मंडळींनी महाराष्ट्र राज्याला केवळ लुटण्याचे...

विकासाचे गाजर दाखवून राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीतील  मंडळींनी महाराष्ट्र राज्याला केवळ लुटण्याचे काम केले आहे

14
0

आशाताई बच्छाव

1000950072.jpg

जालना ः दिलीप बोंडे ब्युरो चीफ 
विकासाचे गाजर दाखवून राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीतील  मंडळींनी महाराष्ट्र राज्याला केवळ लुटण्याचे काम केले आहे. राज्यातील प्रमुख उद्योग गुजरातला पळवून लावण्याचे पाप करणाऱ्या महायुती सरकारला या निवडणुकीत जनता निश्चितपणे घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी आज येथे बोलतांनी व्यक्त केला.
जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ शहरातील हॉटेल अमितमध्ये आज शनिवारी आयोजीत करण्यात आलेल्या विराट जाहिर सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. तर खा. चंद्रकांत हंडोरे, खा. डॉ. कल्याण काळे, जालना लोकसभा प्रभारी माजी मंत्री डॉ. पी. सी. शर्मा, पक्षाचे जिल्हा प्रभारी मा. आ. नामदेवराव पवार, आ. राजेश राठोड, मा. आ. वजाहत मिर्झा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जेष्ठनेते एकबाल पाशा, नवाब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, राजेंद्र राख, विजय चौधरी, युवानेते अक्षय गोरंट्याल, राम सावंत, भिमशक्तीचे प्रमोदकुमार रत्नपारखे, बदर चाऊस, रिपाईचे जिल्हाध्यक्ष किशोर मघाडे, दिनकर घेवंदे, आपचे संजोग हिवाळे, सपाचे अमजद फारूखी, नंदकिशोर जांगडे, अखबर खॉ, अब्दुल रऊफ परसुवाले आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना पटोले म्हणाले की, मराठवाडा विभागासाठी उपयुक्त असलेली मराठवाडा वॉटरग्रीड योजना पुर्ण करून या योजनेच्या माध्यमातून विभागातील प्रत्येक शहर आणि जिल्हयातील शेतकऱ्यांना  पाणी देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या काळात केला जाईल.

Previous articleशेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना लाटत्तांनाच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कोटयावधी रुपयांच्या भ्रष्टाचार
Next articleअर्जुनराव खोतकर यांचा ग्रामीण आणि शहरी भागात डोअर टू डोअर प्रचार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here