Home भंडारा आरक्षणाच्या उपवर्गीकरणा करिता एससी ,एसटी ,अ ,ब ,क ,ड करिता गठित केलेल्या...

आरक्षणाच्या उपवर्गीकरणा करिता एससी ,एसटी ,अ ,ब ,क ,ड करिता गठित केलेल्या समितीला काँग्रेस पक्ष विरोध करणार -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

139
0

आशाताई बच्छाव

1000949988.jpg

आरक्षणाच्या उपवर्गीकरणा करिता एससी ,एसटी ,अ ,ब ,क ,ड करिता गठित केलेल्या समितीला काँग्रेस पक्ष विरोध करणार -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

संविधान बचाव संघर्ष समितीचा महाविकास आघाडीला समर्थन जाहीर

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक 8/ 11/ 2024 रोजी, संविधान बचाव संघर्ष समिती व एकीकृत रिपब्लिकन समिती जिल्हा भंडारा ची सभा सदानंदजी इलमे मुख्य संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा यांचे अध्यक्षतेखाली, रोशन जांभुळकर यांचे कॉलेजमध्ये पार पडली. सभेला 21 सभासद हजर होते. राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यास आरक्षणाच्या वर्गीकरणाकरिता गठीत केलेल्या समितीस काँग्रेस पक्ष विरोध करेल. या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या लेखी पत्राच्या अटीवर महाविकास आघाडीला समर्थन करण्याचा ठराव १७ विरुद्ध ४ मतांनी पारित करण्यात आले.
भाजपा समर्थित महायुतीची सरकार ही संविधान विरोधी असून, त्यांना ह्या देशात मनु वाद आणायचे आहे. त्याची सुरुवात त्यांनी शिक्षणात मनु वाद आणून केली आहे. नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, जि. प. शाळेचे खाजगीकरण, आणि आता आरक्षणाचे वर्गीकरण करून दलित आदिवासी व ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आणले आहे. बहुजन समाजाला मनुवाद्यांच्या गुलामीतून मुक्त करण्याकरिता, भाजपा समर्थित महायुतीचा पराभव करणे काळाची गरज आहे.
राज्यात आंबेडकरवादी नेत्यांचे एकीकरण नसल्याने, आंबेडकरी विचाराचा उमेदवार निवडून येत नाही. एकीकरणास अथक प्रयत्न करूनही रिपाई नेते एकत्र येण्यास तयार नाहीत. एकाच मतदारसंघात आरपीआयचे अनेक उमेदवार असल्याने त्याचा फायदा मनुवादी लोकांनाच होत असतो.
संविधानाच्या रक्षणाकरिता व आरक्षणात वर्गीकरण करण्याकरिता महायुती सरकारने जी कमिटी गठीत केली आहे, त्या कमिटीचा विरोध करण्याचा लेखी आश्वासन महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस यांनी दिला असल्याने, महाविकास आघाडीला जाहीर समर्थन देण्याचे जाहीर केले आहे.
सर्व संविधान प्रेमी व आरक्षणवादी लोकांना विनंती आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारास बहुमताने विजयी करावे. असे आवाहन सदानंद इलमे मुख्य संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा ,रोशन जांभुळकर अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा ,चंद्रशेखर टेंभुर्णे अध्यक्ष बुद्धिस्ट समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था लाखांदूर ,अमृत बनसोड मुख्य संयोजक एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा,बाळकृष्ण सार्वे ,वामन गोंधळे ,गोपाल सेलोकर श्रीकृष्ण पडोळे , आसित बागडे,सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे,राजेश मडामे, पी डी ढगे, दिलीप वानखेडे,विजय भोवते, डॉ सुरेश खोब्रागडे, यांनी केलेले आहे.

Previous articleटिंगरीत शासकीय कर्मचाऱ्यांकडून आचारसंहिता भंग
Next article‘चला, मेळघाटमधील आपल्या भाऊबहीणींना मदतीचा हात देऊ या’’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here