Home उतर महाराष्ट्र राजकारण हा माझा धंदा नाही – आमदार लहू कानडे

राजकारण हा माझा धंदा नाही – आमदार लहू कानडे

33
0

आशाताई बच्छाव

1000911643.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी– कष्टकरी गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनतेची कामे केली. मायबाप जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. राजकारण हा माझा धंदा नाही. परंतु गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न जाणून असल्याने ते सोडवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीच्यावतीने श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उत्सव मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. कानडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अमृत काका धुमाळ, अरुण पाटील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, ॲड. रावसाहेब करपे, प्रा. कार्लस साठे, अशोक कारखान्याचे संचालक लाल पटेल, राहुरी बाजार समितीचे माजी सभापती वेणूनाथ कोतकर, आदिवासी भिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आ. कानडे म्हणाले, काँग्रेस पक्ष आपली उमेदवारी नाकारेल, असे कोणालाही वाटत नव्हते. विधानमंडळाचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न केले. मात्र काही चांडाळ चौकडीने तसेच ज्यांची दुकाने बंद झाली त्यांनी खोटेनाटे पसरवण्याचे काम केले. अपप्रचार केला. त्यामुळे आपली उमेदवारी कापली गेली. असे असले तरी कोण किती लायकीचे आहेत ते आपण पुढील काळात बोलू, तेही पुराव्यानिशी सांगू, उमेदवारी नाकारल्याने आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी दिल्लीशी चर्चा करून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अनेकांचे पुन्हा पोट दुखल्याचे सांगत श्री. पवार यांनी आपल्याला त्यांच्या कुटुंबात सामील करून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

जनतेने आपल्यावर जी जबाबदारी दिली, त्या जबाबदारीच्या माध्यमातून मतदार संघात विकास कामे केली. त्या कामाचा लेखाजोखा मांडला पाहिजे या हेतूने केलेल्या कामाचा कार्य अहवाल घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षातील पहिली दोन वर्षे कोरोनात गेली. कोरोनानंतर महाआघाडीची सत्ता बदलली. तरी देखील मतदार संघात अकराशे ते बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. त्यासाठी अजित पवार यांचे सहकार्य लाभले. विकास कामांचे फलक लावून विकास कामांमध्ये पारदर्शकता आणल्याचे आ. कानडे यावेळी म्हणाले.

अविनाश आदिक म्हणाले कि, आ. कानडे समर्थ व सक्षम नेतृत्व आहे. ते शब्दाचे व निष्ठेचे पक्के आहेत. आ. कानडे यांनी बरोबर यावे, अशी आपली अनेक वर्षापासूनची इच्छा होती, ती आता पूर्ण झाली. स्व. गोविंदराव आदिक यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणली. त्याच पद्धतीने आ. कानडे यांनी मतदारसंघात काम केले. परंतु त्यांच्या कामाचे चिज झाले नाही. सर्वेक्षणांमध्ये आ. कानडे पहिल्या क्रमांकावर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी त्यांना पसंती दिली. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार असून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून विधानसभेत जाणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक वर्ष गमती जमती करणारे आज सोबत दिसत नसल्याने माझ्यासोबतच तुमच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत असल्याचे ते म्हणाले.

आ. कानडे यांनी नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना खूप सहकार्य केले. शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. जातीभेद, गट-तट याचा विचार न करता सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याचे माजी नगरसेवक राजेंद्र पवार यावेळी म्हणाले. विष्णुपंत खंडागळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाबासाहेब कोळसे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

यावेळी माजी नगरसेवक सलीम शेख, मल्लू शिंदे, अशोक कारखान्याचे माजी संचालक लाल पटेल, बाळासाहेब मुंगसे, उद्योजक अंकुश कानडे, माजी नगरसेवक अशोक कानडे, सतीश बोर्डे, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, युनुस पटेल, विजय शेलार, ॲड. समिन बागवान, रज्जाक पठाण, अजय खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल, सरपंच किशोर बकाल, हंसराज आदिक सुनील थोरात, आदित्य अदिक, साजिद मिर्झा, बाळासाहेब उंडे, संदीप चोरगे, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले, भागचंद औताडे, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, आबा पवार, मदन हाडके, रमेश आव्हाड, अमोल आदीक, ज्ञानदेव आदीक, दीपक कदम, अजिंक्य उंडे, अक्षय नाईक, मुदस्सर शेख, इमरान शेख, भैय्या शहा, सागर कुऱ्हाडे, बाबासाहेब ढोकचौळे, अण्णासाहेब गवारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे, रवींद्र मुरकुटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, पी. एस. निकम, रवी अण्णा गायकवाड सचिन ब्राह्मणे, संदीप दांगट, तुकाराम चींधें, राधाकृष्ण तांबे, डॉ. सर्जेराव सोळुंके, अनिल बिडे, नानासाहेब बडाख, विष्णुपंत बडाख, विजय दवंगे, जमीर पिंजारी, कदिर पटेल, हरिश्चंद्र साळुंके, रवी राजुळे, सचिन कोळसे, दिलीप तुपे, दत्तात्रय जाधव, जुगल गोसावी, कोंडीराम विटनोर, सुभेदार सय्यद, गोरक्षनाथ नान्नोर, सरपंच ॲड. पूजा लावरे, रुबीना पठाण, रमा धीवर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

….

Previous articleधांद्रीत झोपडीला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक
Next articleचिखलपहेला येथे 3 नोव्हेंबरला स्वप्न जळाले सरणावरती या नाट्यप्रयोगाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here