आशाताई बच्छाव
मोताळ्यात चोरट्यांनी दोन दिवसा आधीच केली दिवाळी साजरी…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मोताळा – सर्वसामान्यांची दिवाळी
अवघ्या काही दिवसांवर आली असतांना मात्र चोरट्यांनी शनिवारी च मोताळा शहरात दिवाळी साजरी केली आहे. अशी तशी दिवाळी साजरी केली नाही तर तब्बल 5 लाख 12 हजार 387 रुपयांचा चोरट्यांनी लंपास केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये राहत असलेल्या अमोल न्हावकर आपल्या कुटुंबातील सदस्या सोबत दिवाळी च्या खरेदी करिता बुलढाणा येथे गेलेल्या असतांना यांच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून 26 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हाथ साफ केल्याची घटना घडली दिवाळी ची खरेदी करून अमोल न्हावकर आपल्या कुटुंबातील सदस्या सोबत रात्री उशिरा 9 वाजे दरम्यान घरी आल्या नंतर सदरची घटना उघडीस आली. या बाबत अमोल शिवाजी न्हावकर वय 27 राहणार मलकापूर रोड प्रभाग क्रमांक 16 मोताळा यांनी रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी बोराखेडी पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. की
दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान मी माझ्या कुटुंबातील सदस्या सोबत राहत असलेल्या मलकापूर रोड प्रभाग क्रमांक 16 मोताळा येथील माझ्या घरात
अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप
तोडुन घरात प्रवेश करत घरात असलेल्या देव घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने एकूण किंमत 5 लाख 12 हजार 387 रुपये चोरून नेले आहे. अश्या अमोल शिवाजी न्हावकर वय 27 राहणार मलकापूर रोड प्रभाग क्रमांक 16 मोताळा यांच्या फिर्यादी वरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक 539/2024 च्या कलम 331(3),331(4),305 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची गंभीरता बघता घटनास्थळी डॉग स्कॉट, फिंगर प्रिंट एक्स्पर्ट यांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली असुन या बाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय.बालाजी शेंगेपल्लु करीत
आहे.