आशाताई बच्छाव
पॉलिटिक्स ! महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विजयासाठी सोडावे लागतील ‘रुसवे-फुगवे’ जयश्रीताईंसारखा सोज्वळ चेहरा आमदार होण्यासाठी सर्वांच्या प्रेयत्नांची गरज !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा महाविकास आघाडीच्या वतीने बुलढाण्यात अॅड. जयश्रीताई शेळके यांचे नाव निश्चित झाल्यानंतर एकीकडे जनतेत त्या नावावरून मोठी चर्चा असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये छुप्या पद्धतीचे रुसवे-फुगवे समोर आले आहेत. मात्र, जर खरंच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करणे व महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करायचा
असेल, तर महाविकास आघाडीतील नेत्यांना मनापासून काम करावे लागणार असून, आपले तात्पुरते रुसवे-फुगवे सोडावे लागणार आहेत. कारण जर आघाडी एकसंध राहिली तर सर्वांनाच त्याचा लाभ मिळळणार आहे, अन्यथा आपापल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी संपूर्ण आघाडीचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या सुमारे २० ते २५ वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने सामाजिक चळवळीत सक्रिय असणाऱ्या अॅड. जयश्रीताई शेळके यांना शिवसेना (उबाठा) गटाकडून उमेदवारी प्राप्त झाली. खरेतर यामागे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमकडूम मोठा विचार झालेला असणार यात काहीच शंका नाही. महायुतीचे उमेदवार
संजय गायकवाड यांना हरवण्यासाठी एका तुल्यबळ उमेदवाराची आवश्यकता होती. आमदार संजय गायकवाड यांना कोणीही साधा-सुधा उमेदवार हरवू शकत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. शिवाय निवडणुकीत जो उमेदवार द्यायचा, तो जनतेत सक्रिय असलेलाच देणे आवश्यक आहे. हा सर्वांगीण विचार करूनच अॅड. जयश्रीताईंचा विचार झालेला आहे, यात काहीच शंका नाही.
अॅड. जयश्रीताई शेळके गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय चळवळीत सक्रिय राहिल्या आहेत. एकीकडे कुटुंब, दुसरीकडे वकिली पेक्षा, सामाजिक चळवळी, महिलांचे प्रश्न, बचतगटाच्या
माध्यमातून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण या सर्वांसाठी त्या सातत्याने झटत आलेल्या आहेत. जनतेच्या प्रश्नांची जाण त्यांना अत्यंत खोलवर आहे. लोकांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची जिद्द त्यांच्यात आधीपासूनच आहे. मतदारसंघातील गावा- गावातील उंबऱ्या-उंबऱ्यापर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे. पक्षनिष्ठा ही त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. म्हणूनच की काय, जेंव्हा भाजपची लाट होती, त्या वेळी बरेचसे काँग्रेसी नेते-कार्यकर्ते हे भाजपवासी झाले होते, तरीही जयश्रीताई शेळके खंबीरपणे काँग्रेसमध्येच राहिल्या. आता बुलढाण्याची ही जागा शिवसेने (उबाठा गट) ला सुटल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसे पाहता जयश्रीताई शेळके
यांनी सातत्याने बहुजनवादी राजकारणच केले आहे. त्यांनी आपल्या राजकारणात कधीही जातिभेद पाळला नाही. त्यांनी प्रत्येक समाजातील महिला- पुरुषांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्याची जाण ठेवणे गरजेचे आहे.
शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्येही निवडणुकीच्या तिकिटासाठी अनेक जण इच्छुक होते. अनेकांना असे वाटत होते की आपल्यालाच उमेदवारी मिळावी. यामध्ये सर्वांत पुढे होते ते जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत. पक्षातील फाटाफुटीच्या वेळेस आणि नेत्यांच्या सुरत- गुवाहाटीच्या राजकीय पर्यटनाच्या वेळी व त्यानंतरही बुधवत हे उद्धव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ राहिले.
पर्यायाने तिकीट न मिळाल्याने बुधवत यांचा चांगलाच हिरमोड झालेला असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला टक्कर देण्याचे काँग्रेसच्या उमेदवाराने केले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इतर इच्छुकांच्याही अपेक्षांवर विरजण पडले आहे. या स्थितीत कमीत कमी पूर्वाश्रमीची काँग्रेसी निष्ठावान महिलाच आमदार होऊ शकते. या कार्यात आपलेही खारीचा वाटा असेल, हा विचार करून काँग्रेसींनी या कार्यात जोमाने उतरण्याची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हा पक्ष काँग्रेसचा नैसर्गिक मित्रपक्ष राहिलेला आहे. तसेच खुद्द महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या
पुढाकारातून महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी आहे. या स्थितीत आपापली राजकीय महत्वाकांक्षा आणि रुसवे-फुगवे बाजूला ठेवून त्यांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे. कारण साहेबांची मर्जी सांभाळायची असेल, तर महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश मिळवून देणे गरजेचे आहे. ही संपूर्ण स्थिती पाहता महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करून अॅड. जयश्रीताई शेळके यांना निवडून आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय यशाची चव चाखता येणार नाही.