Home नागपूर विविध गटातटात विभागलेल्या आंबेडकरी गटांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी

विविध गटातटात विभागलेल्या आंबेडकरी गटांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी

138
0

आशाताई बच्छाव

1000827290.jpg

विविध गटातटात विभागलेल्या आंबेडकरी गटांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी

रवी भवन नागपूर येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडीची सभा संपन्न

 

नागपूर( संजीव भांबोरे )एकच लक्ष्य रिपब्लिकन ऐक्य या मागणीला धरून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेशच्या वतीने आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 ला रविभवन नागपूर येथे विविध गटात विभागलेल्या आंबेडकरी जनतेने एकत्रितपणे येऊन निवडणूक लढवावी व मताचे विभाजन टाळावे याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अमृतजी गजभिये होते. मुख्य संयोजक प्राध्यापक प्रदीप बोरकर, मुख्य अतिथी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, निमंत्रक दिनेश गोडघाटे ,सयोजक कैलास बोंबले ,संयोजक दिनेश अंडरशहारे, बाळू कोसमकर (मामा )उत्तर नागपूर उपस्थित होते.समजा नेते एकत्र येत नसतील तर त्यांची जागा जनतेने दाखवून द्यावी अशाप्रकारे सदर बैठकीत निर्णय घेण्यात आला व संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीने उत्तर नागपूर व भंडारा विधानसभेची निवडणूक लढण्यासंबंधी सुद्धा चर्चा करण्यात आली. या सभेत विविध गटात विभागलेल्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी जनतेच्या मतांचे विभाजन टाळावे .लोकशाही ,गणतंत्र बळकट करावे याकरिता प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. समजा नेते एकत्र येत नसेल तर जनता त्याची जागा दाखवेल असे सुद्धा प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले . यावेळी बाळू कोसमकर (मामा ),प्रकाश कुंभे ,राज सुखदेवे, हंसराज मेश्राम,प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, रोशन जांभुळकर,, , साहित्यिक अमृत बनसोड, , ,रमेश पाटील, महादेव गोडबोले, ,शेषराव गणवीर ,रमेश फुले ,सूर्यभान शेंडे, संजीव भांबोरे , यांनी मार्गदर्शन केले .

. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिलीप वानखडे, ,विजय भोवते, ,राजेश मडामे, ज्ञानचंद जांभुळकर ,गोपीचंद्र अंभोरे, दिलीप वानखेडे , सुधाकरराव टवळे ,रमेश गेडाम, चुडामन हटवार, मनोहर गायकवाड, कुंदाताई जांभुळकर ,सुनील झोडापे, डॉक्टर चरणदास जनबंधू ,शेषराव गणवीर यांनी सहकार्य केले.

Previous articleअमरावती शहरात धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून त्रिकोणातून तरुणीने केली  तरुणीची हत्या.
Next articleदेवीच्या साडेतीन पीठांमध्ये रेणुका देवीचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here