Home बीड परळीत ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र आज...

परळीत ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र आज वाटप: डॉ.संतोष मुंडे

25
0

आशाताई बच्छाव

1000822205.jpg

परळीत ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र आज वाटप: डॉ.संतोष मुंडे

यंदा १००० श्रवण यंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०७ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून आज ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीनाथ हॉस्पिटल येथे कमी ऐकू येणाऱ्या कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक डॉ संतोष मुंडे यांनी दिली आहे. आजवर ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४६०० गरजूंना मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आजच्या शिबिराद्वारे १००० गरजूंना श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे संतोष मुंडे यांनी सांगितले आहे. दिव्यांग मंत्रालय व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने परळी मतदार संघातील गरजू रुग्णांना हे श्रवण यंत्र वितरित केले जाणार आहेत. श्रवणयंत्र वाटप (कानाच्या मशीन) शिबिरासाठी ज्यांनी आपली नाव नोंदणी केली आहे. अशा रुग्णांना आज सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेच्या दरम्यान श्रीनाथ हॉस्पिटल येते श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप केले जाणार आहे असे आव्हान शिबिराचे संयोजक डॉ संतोष मुंडे यांनी केले आहे. तसेच हे शिबिर परळी मतदार संघातील गरजू नागरिकांसाठीच आहे असे त्यांनी सांगितले आहे. दिव्यांगासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ना. धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून आयोजित केलेल्या या उपक्रमाचा परळी मतदारसंघातील कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर ज्येष्ठ नागरिक, महिला तथा गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे दिव्यांग मंत्रालय उपाध्यक्ष तथा शिबिराचे संयोजक डॉ संतोष मुंडेंनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here